कललेले पोल, लोंबकाळणाऱ्या तारांमुळे नागरिकांच्या जीवाचा कोंडमारा!

wires
wires

येवला : पहिला पाऊस सोबत वादळाला घेऊन येतोच आणि तालुक्यात शेकडो विजेचे पोल जमीनदोस्त करतो...असे चित्र तालुक्याच्या आता अंगवळणी पडले आहे.यामुळे वादळी पाऊस आला कि नागरिकांना जीव मुढीत धरून विजेच्या खांबा व तारांपासून दूर रहावे लागत आहेत.आजही ग्रामीण भागात अनेक ठिकाणी कललेले पोल व लोंबकळत असलेल्या तारा असे धोकेदायक चित्र दिसत आहेत.

तिकडे मराठवाड्याची सरहद्द तर इकडे निफाडची सीमा इतका मोठा भूभाग तालुक्याने व्यापला आहे.यामुळे तालुक्यात टॅावर लाईन,मेन लाईनसह साध्या लाईनच्या पोलची व तारांचे प्रमाण अधिक आहे.त्यातही १९७२ च्या दशकात अनेक ठिकाणी खांब उभे केले व तारा ओढल्यानंतर आजपर्यंत दुरुस्ती व्यतिरिक्त महावितरणने काहीही केलेले नाही.यामुळे वर्षागणिक तारा तुटणे व पोल पडण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते. 

तालुक्यात अनेक ठिकाणी शेतीमधून गेलेले पोल वाकलेले असून तारा लोंबकळत आहे.अनेक रोहित्र देखील उघडे आहेत. ऑगस्ट २०१७ मध्ये गवंडगाव येथे बाजीराव भागवत शेतीकाम करीत असतांना उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीची तार तुटून अंगावर पडल्याने विजेच्या तिव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.यापूर्वीही राजापूर,मुखेड भागात अश्या छोट्या-मोठ्या घटना घडल्या आहेत.यावर्षी ३० मेला पूर्व व पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने विजेचे चार टॅावर लाईनसह ५०० वर विजेचे पोल उन्मळून पडले असून सुदैवाने जीवित हानी झाली नाही.मात्र अजूनही १५० वर पोल राहिलेले नसल्याने विजपुरवठ्याचा प्रश्न आहेच.
अपुरी कर्मचारी संख्येने महावितरण कुचकामी होतांना दिसतेय,मात्र जमेची बाजू म्हणजे महावितरणने दुरुस्तीसह नव्याने जोडण्या देण्याची मोहीम हाती घेतल्याने झळाळी मिळत आहे पण नव्या सोबत जुन्यांचा देखील बंदोबस्त करण्याची गरज आहे.वीजपुरवठ्याचे नूतनीकरण हि समाधानाची अबब असली तरी जिंर्ण पोल व तारांना झळाळीची गरज आहे.   

आकडे बोलतात
-एकूण वीजउपकेंद्र - १२
-मागील वर्षात रोहित्राची क्षमता वाढ - १६०
-नव्याने टाकलेल्या लाईनची लांबी - सुमारे ४० किमी
-येवला शहरात रोहित्राची क्षमता वाढ - ३५
-वादळाने पडलेले पोल - सुमारे ५००
-अजूनही उभे न राहिलेले पोल - १४०

“गरजेनुसार लाईनची पेट्रोलिंग होते तसेच दरवर्षी मेंटेनन्स देखील होतोच.परंतु वादळ आले कि पोल उन्मळून पडण्याचे प्रमाण तालुक्यात अधिक आहे.जेथे जेथे धोक्याची स्थिती आहे व जेथून तक्रारी आहे अश्या ठिकाणी दुरस्तीला प्राधान्य दिले जाते.अजूनही तालुक्यात अनेक ठिकाणी तारा बदलवणे,पोल टाकणे,रोहित्र बसवणे हि कामे प्रस्तावित आहेत.”
- राजेश पाटील, सहाययक अभियंता, येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com