जिल्ह्यात दहा हजार ८२७ नवमतदारांची नोंदणी

जिल्ह्यात दहा हजार ८२७ नवमतदारांची नोंदणी

धुळे - भारत निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त उद्या (ता. २५) जिल्हाभरात राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम होईल. जिल्ह्याचा मुख्य कार्यक्रम उद्या सकाळी दहाला येथील कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात होईल. त्यात जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या उपस्थितीत तृतीयपंथी नवमतदारांना निवडणूक ओळखपत्रांचे वितरण, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांना प्रशस्तिपत्राचे वितरण होईल. अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी जे. आर. वळवी यांनी दिली.

दरम्यान, जिल्ह्यात गेल्या ऑक्‍टोबरमध्ये जिल्ह्यात १० हजार ८२७ नवमतदारांनी नोंदणी झाली. यात सर्वाधिक २९८४ मतदारांची शिरपूर मतदारसंघात नोंदणी झाली. साक्री मतदारसंघात २१८३, धुळे ग्रामीण मतदारसंघात २१९६, धुळे शहर मतदारसंघात २२७१, तर शिंदखेडा मतदारसंघात १२०३ नवमतदारांची नोंदणी झाली.

देशभरात गेल्या वर्षी मतदार नोंदणी आणि मतदारयादीच्या अद्ययावतीकरणाची मोहीम राबविण्यात आली. वर्षभरातील निरंतर प्रक्रियेअंतर्गत आणि १६ सप्टेंबर ते २१ ऑक्‍टोबर २०१६ या कालावधीतील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात १८ हजार ७६४ मतदारांची नोंदणी झाली. यात १० हजार ७७ पुरुष, तर ८६७८ महिला आणि नऊ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. या १८ हजार ७६४ मतदारांपैकी ऑक्‍टोबर २०१६ मध्ये १० हजार ८२७ नवमतदारांनी मतदार नोंदणी केली. या मतदारांची ओळखपत्रे प्राप्त झाली असून, संबंधित मतदान केंद्रांवर त्यांचे वाटप होत आहे. सैनिक मतदारांसाठीही जिल्हा प्रशासन मतदार नोंदणी करते. यात जिल्ह्यात १० जानेवारीपर्यंत तीन हजार ९९ सैनिक मतदार असल्याचेही श्री. वळवी यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात मतदारसंघनिहाय नवमतदारांची संख्या
धुळे शहर विधानसभा मतदारसंघ - पुरुष-१२४२, महिला-१०२०, तृतीयपंथी-०९
साक्री विधानसभा मतदारसंघ - पुरुष-११११, महिला-१०७२
धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ - पुरुष-१२९०, महिला-९०६
शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ - पुरुष-६३४, महिला-५६९, 
शिरपूर विधानसभा मतदारसंघ - पुरुष-१६९२, महिला-१२९२
एकूण - १०८२७, पुरुष-५९६९, महिला-४८४९, तृतीयपंथी- ०९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com