मार्च एन्ड नव्हे, छोट्या व्यावसायिकांचा ‘द एन्ड'

मार्च एन्ड नव्हे, छोट्या व्यावसायिकांचा ‘द एन्ड'

तळवाडे दिगर (नाशिक) : सुरुवातीला मंदीनंतर नोटाबंदी आणि त्यात भर अजून पुन्हा जीएसटी व मुळावर उठलेले ऑनलाईन मार्केटिंग. यामुळे छोट्या व्यापाऱ्यांची अवस्था‘ इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे. प्रतिवर्षी मार्च अखेरीस काही ना काही उद्योग करून व्यवहार, कर्ज व व्यापाराचा मेळ घालणारे हे छोटे व्यापारी यावर्षी जीएसटीमुळे अडचणीत आले आहेत. छोट्या व्यापाऱ्यासाठी हा मार्च एन्ड व्यवसायाचा ‘द एन्ड’ करणारा ठरत आहे.

आधीच बाजारपेठेत सर्वत्र मंदी आहे. त्यात भर म्हणून ‘ अच्छे दिन’चे दिवास्वप्न घेऊन आलेल्यांनी तर जी काही ध्येय धोरणे राबवली ती म्हणजे पूर्वीच्या बुरे दिनपेक्षा भयानक ठरली आहे. पूर्वी भलेही सामान्य माणूस अथवा छोटे व्यापारी दैनदिन श्रीखंड पुरी खात नव्हते मात्र किमान हक्काची भाजी भाकर तरी त्यांच्या ताटातून कोणी हिसकावून घेतली नव्हती. मात्र गेल्या दोन वर्षापासून सध्याच्या शासनकर्त्यांनी ऑनलाइन व्यापाराला दिलेले प्रोत्साहन शिवायत्यानंतर नोटाबंदीचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्रईक व नंतरच्या जीएसटी करप्रणाली यामुळे मगबुडत्याचा पाय खोलात याप्रमाणे छोटे व्यापारी अक्षरशः देशोधडीला लागले. सुरुवातीच्या काळात याची काही प्रमाणात झळ बसली मात्र नंतर या बाबी किचकट होत गेल्या.

दुकानात असणारा शिल्लक माला वर तात्पुरत्या गरजा भागविल्या. पण मुळातच मंदी आणि त्यानंतर नोटाबंदी यामुळे बाजारात रोख पैसाच फिरेना. दरम्यानच्या काळात ऑनलाईन व्यवसायांचे वाढते प्रमाण थेट विक्री व्यवस्था व नानाविध व्यावसायिक आमिषे, योजना तर शासनाकडूनही  क्रेडीट,डेबिट कार्ड याचा वापरावर अधिकाधिक भर देण्याची धोरणे यामुळे मग सामान्य ग्राहक छोटे व्यावसायिक व ग्रामीण व्यापार व्यवस्था पूर्णपणे डबघाईला आली तर मोठ्या व्यापाऱ्यांनी जीएसटी बाबतीत घातलेल्या निर्बंधांमुळे छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना किरकोळ माल खरेदी करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. याशिवाय बाजारपेठांमध्ये ग्राहक नसल्याने मग छोटा व्यापारी मोठ्या होलसेल व्यापाऱ्यांची देणी वेळेत भागवूच शकत नाही. आहे त्याच मालावर या स्पर्धात्मक युगात धंदा करणे अवघड तर दुसरीकडे वाढत्या दुकानामुळे झालेल्या जीवघेण्या स्पर्धेमुळे नाफ्याचीकामी झालेली टक्केवारी यामुळे कित्येकदा छोट्या व्यापाऱ्यांची उलाढाल म्हणजे केवळ हमची ठरत असते.

आजवर मार्च अखेरीस काही नं काही झोल करून व्यवहार, कर्ज भरून पुन्हा नवे कर्ज घेऊन पुढच्या वर्षाची किमान अशा धरली जायची, मात्र आता तेही नशिबात नाही . त्यामुळे मग दुसरा कोणताच उपाय नसल्याने मग नाईजाने शेवटी आहेत तोही छोटा व्यापार बंद करण्यापलीकडे संबंधितांच्या हातात काहीच राहत नाही . यापूर्वी ग्रामीण भागात दैनदिन अथवा आठवडा बाजारातून छोटे व्यापार करणारे यापूर्वीच इतिहास जमा झाले आहेत.

नोटाबंदी व जीएसटीमुळे प्रत्येक घटक अडचणीत आला आहे. प्रत्येकाला याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्रास सहन करावा लागला आहे. अनेक लहान व्यापाऱ्यांनी आपेल व्यवसाय बंद केले आहेत परिणामी बेरोजगारी अधिकच वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com