स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही एसटीचे दर्शन घडेना!

bus
bus

मारतळ: देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे पूर्ण झाली पण अजूनही अनेक गावे मुलभूत सुविधेपासून वंचित अाहेत. मारतळा परिसरातील बारा गावांमध्ये एस. टी. बसही पोचली नसल्याने त्या गावातल्या नागरिकांना अाजही शहर गाठण्यासाठी पायपीट करावी लागते. दळणवळणाच्या साधनाअभावी इच्छा असूनही गावातील अनेक मुलींना उच्च माध्यमिक शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याने मुलभूत सुविधा पुरवण्यात लोकप्रतिनिधी व शासन अपयशी ठरल्याचे वास्तव पाहावयास मिळत अाहे.

राज्य परिवहन महामंडळाकडून ‘गाव तेथे बस’ हात दाखवा गाडी थांबवा, प्रवासी सौजन्य सप्ताह, प्रवासी वाढवा अभियान, जनता गाडी, परिवर्तन बस असे अनेक विविध उपक्रम वर्षभर राबविले हे खरे असले तरी अाजही अनेक गावापर्यंत बस पोहचली नाही. त्यात लोहा तालुक्यातील कामळज, कौडगाव, चिंचोली, नांदगाव, डोणवाडा, टाकळगाव, वाकळी (बुद्रुक), कापसी (खुर्द) वाकळी(खुर्द), डोलारा, पिंपळदरी या गावांचा समावेश अाहे. त्यामुळे विद्यार्थी, वृद्ध, महिला, नागरिकांना खासगी वाहनाचा अाधार वळेप्रसंगी पायपीट करावी लागते. महामंडळ सांगते रस्ते नाहीत, तर प्रशासन सांगते बजेट नाही या दोघांच्या चाल ढकलीमुळे जादा पैसे मोजूनही जीवघेणा प्रवास करावा लागतो अशी परखड प्रतिक्रीया विश्वांबर कदम डोणवाडा यांनी ‘सकाळ’शी बोलतीनी व्यक्त केली. हा भाग तालुक्यापासून अगदी शेवटच्या टोकावर असून येथे नदीकाठमुळे काही गावांचे ३५ ते ४० वर्षापूर्वीच पुनर्वसन झाले. काही गावात रस्ते झाले पण विकासाच्या प्रवाहापासून ही गावे अाजही कोसोदूरच राहिली.
------
सात दशकानंतर गावे अविकासीतच का?
निर्मलग्राम गटारमुक्त गाव तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कामकाज, तंटामुक्त गाव कौडगाव येथे पुनर्वसनामुळे गावात रस्ते झाले मात्र इतर जोडण्याऱ्या गावांना ४ किमीच्या रस्त्यात खड्डेच खड्डे पडल्याने वाहन जाणेही मुश्किल झाले अाहे. विविध पुरस्कार मिळवणारी गावे अाजही रस्त्याअभावी अविकासीतच अाहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com