उन्हाळ कांद्याला भाव नाही तर चाळीत साठणूक सही!

onion
onion

येवला : शेतातील उन्हाळ कांद्याची काढणी वेगात सुरू असताना सध्या समाधानकारक दर नसल्याने कांदा उत्पादकांना त्याचा फटका बसत आहे.परिणामी काढलेला कांदा थेट विक्रीपेक्षा चाळीत साठवणूक करण्याला शेतकरी प्राधान्य देत आहेत.कांद्याला भाव नाही तर साठणूक सही या सूत्राने मातीमोल भावाने विक्री करण्यापेक्षा चाळीत तसेच आडोश्याला पोळी घालून कांदा साठवला जात असल्याचे चित्र आहे.  

पाच महिने कांद्याला मिळालेला विक्रमी भाव लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी प्रतिकूल स्थितीतही कांद्याचे उत्पादन घेतले आहे.त्यातच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आदी राज्यात उन्हाळ कांद्याचे उत्पादन घेतले गेल्याने साहजिकच आपल्याकडील कांद्याला मागणी कमी असल्याने त्याचा परिणाम भावावर झाला आहे.हजार ते पाच हजारांपर्यत मिळणाऱ्या भावाने मागील दोन ते अडीच महिन्यात निच्चाकी आकडा गाठला आहे.येथील बाजार समितीत ३०० ते ६७० पर्यत भाव स्थिर असून या भावात कांदा विक्री करणे अजिबातहि परवडणारे नसल्याने दुय्यम प्रतींचा कांदाच सध्या विक्री केला जात असून प्रतवारी करून उत्तमदर्जाचा बाजूला काढलेले कांदे मात्र प्रत्येक जन साठवनुक करून ठेवत आहेत.

सरते शेवटी दारात वाढ होत असल्याने साठवणूक करणाऱ्या प्रत्येकाला वाढीव लाभ मिळणार असला तरी प्रत ढासळने,चाळीत कांदा खराब होणे,वजन घटने या कारणाने बसणारा फटका शेतकऱ्यांच्या माथी लागतो. उत्पादन खर्च, मेहनत, साठवणुकीचा खर्च, वजनात होणारी घट असा सर्व खर्च वजा जाता मिळणाऱ्या दरातून जे शिल्लक राहील तो शेतकऱ्याचा नफा असतो.दुसरीकडे व्यापारी देखील कांदे साठवणूक करत असून त्यांना मात्र केवळ साठवणूक व वजनातील घट असे काही खर्च आहेत.हंगामाच्या प्रारंभी कमी भावात खरेदी केलेला माल त्यांना अधिक परतावा देणारा ठरतो.या गणिताने सद्यस्थितीत खरेदी होणारा उन्हाळ कांदा साठवणुकीसाठी वापरला जात असल्याने भावात वाढ नसल्याचे सूत्र मांडले जात आहे.

तालुक्याच्या पच्छिम भागात सर्वाधिक लागवड झाली असून अवर्षणप्रवण पूर्व भागात मात्र कमी क्षेत्रावर लागवड होती.तालुक्यात आगाद लागवड करून काठनी होताच विक्री करण्याचे प्रमाण ५० टक्के आहेत.साठवणुकीचा अभाव,काढणी करताच अधिक येणारे वजन,आर्थिक अडचणी आदि कारणे यामागे असतात.तर अर्धाच कांदा साठवला जातो.यावर्षी मात्र भावाने दगा दिल्याने पुढे भाव वाढेल या भरवशावर आजमितीस साठवणूक हाच पर्याय सगळे अवलंबत असल्याचे दिसते.येथे दिवसाला होणारी ४५ च्या आसपास ट्रक्टरची व २५० च्या आसपास रिक्षाची आवक सगळे वास्तव सांगत आहे.  

साठवायला नाना प्रयोग...
कांदा चाळीत साठवायचा आहे पण चाळ नाही किंवा आहे तर क्षमता कमी..या अडचणी असूनही शेतकरी बंद पोल्ट्रीत,शेताच्या बांधावर झाडाखाली,जुन्या गोठ्यात,तात्पुरत्या स्वरुपात केलेल्या कुडाच्या चाळीत कांदे साठवत आहेत.जशी भावात सुधारणा होईल तशी विक्री करण्याचा मानस शेतकर्यांचा आहे.मागील काही वर्षात चाळींचे प्रमाण देखील वाढल्याने साठवणूक देखील वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com