नियमांची पायमल्ली करून होतेय पेट्रोल विक्री

petrol pump
petrol pump

चाळीसगाव - शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर ग्राहकांना बाटलीत पेट्रोल दिले जाते. पेट्रोलसारखे अतिज्वलनशिल इंधन बाटलीत देणे धोकेदायक असतानाही याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे.

तालुक्यातील जवळपास सर्वच पेट्रोलपंपावर प्लॅस्टिकच्या बाटलीत पेट्रोल दिले जाते. ग्राहकांची मागणी असल्याने पेट्रोलपपंचालकही सर्रासपणे बाटलीत पेट्रोल देतात. वास्तविक, 'एक्सप्लोसिव्ह ऍक्ट'अंतर्गत अतिज्वलनशील इंधन प्लॅस्टिकच्या बाटलीतून अथवा उघडपणे नेण्याला प्रतिबंध आहे. 

मात्र, यासंदर्भात पाहिजे तशी व्यापक जनजागृती नसल्यामुळे फारसे जाणीवपूर्वक  त्याकडे पाहिले जात नाही. किंबहुना सर्व बाबी माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, अशा प्रकारची विक्री एखादेवेळी   जीवघेणी ठरू शकते. 

पेट्रोल पंपावर 'गाडीत इंधन भरत असताना भ्रमणध्वनीवर बोलू नये,' असे ठळक लिहिलेले असतानाही वाहनधारक त्याकडे दुर्लक्ष करून सर्रासपणे बोलत असतात. पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारीही त्याकडे दुर्लक्ष करतात. असाच प्रकार बाटलीतून पेट्रोल विक्री करताना होत आहे. एखाद्या विपरीत घटनेची वाट न पाहता, पेट्रोलची जीवघेणी विक्री थांबवावी व ग्राहकांनीही बाटलीत पेट्रोल भरून देण्याचा आग्रह टाळणे सर्वांच्याच हिताचे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com