तिसऱ्या दिवशीही केळीला विक्रमी भाव 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

रावेर : लागोपाठ तिसऱ्या दिवशीही केळीचे भाव विक्रमी आकड्यावर स्थिर राहिले. भावात आणखी वाढ होण्याची अपेक्षा केळी उत्पादक शेतकरी व्यक्त करीत असले, तरी आता आहेत तेवढ्याच आकड्यावर ते स्थिर राहण्याची चिन्हे आहेत. 

येथील बाजार समितीने आज सायंकाळी भाव जाहीर केले उद्या (ता. 16) साठीही केळीचे भाव फरकासह 1550 रुपये कायम ठेवले. आंध्र प्रदेशात केळीचे भाव 2500 रुपये, तर बऱ्हाणपूर बाजारात ते 2100 रुपये आहेत. येथे ते 1400 रुपये फरक 25 रुपये असे एकूण 1550 रुपये आहेत. म्हणून भावात वाढ करण्यात यावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी 'सकाळ'कडे व्यक्त केली. 

याबाबत 'सकाळ'ने बाजार समितीच्या केळी भाव निश्‍चिती समितीचे प्रमुख रामदास पाटील (निंबोल) यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले की, बऱ्हाणपूर येथील बाजार समितीत केळीचे भाव 2100 च्या जवळ आहेत पण हे भाव सर्वच शेतकऱ्यांना मिळत नाहीत. एखाद दुसऱ्या शेतकऱ्याला ते मिळतात. तिथे केळी भाव 1000 ते 2100 रुपये आहेत.

आपल्याकडे किमान भाव 1400 रुपये व कमाल 2100 रुपये आहेत. आपल्याकडील निर्यातक्षम व दर्जेदार केळीलाही 500 ते 600 रुपये ऑन मिळून सुमारे दोन हजार /एकवीसशे रुपये भाव मिळत आहे. सर्व बाजूंचा विचार करूनच समिती योग्य भाव जाहीर करते असे ते म्हणाले.

Web Title: North Maharashtra farming banana raver