‘इसिस’च्या नावे धमकीनंतर आता बॉम्बची अफवा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

जळगाव - स्वातंत्र्यदिनी जळगाव, भुसावळ, अमरावती आणि मलकापूर येथील रेल्वेस्थानके बॉम्बस्फोटाने उडवून देणाऱ्या धमकीचे पत्र प्राप्त होण्याची घटना ताजी असताना आज शहरात बॉम्बस्फोटाची अफवा पसरविण्यात आली. या पार्श्वभूमीवर सुरक्षेची खबरदारी म्हणून बुधवारी सकाळी पोलिस अधीक्षकांनी विविध विभागांची बैठक बोलवली आहे.

जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना मिळालेल्या निनावी पत्रात ‘इसिस’चा उल्लेख आहे. रेल्वे स्थानके उडवून देण्याची धमकीनंतर जळगाव, भुसावळसह संबंधित रेल्वेस्थानकांवर सुरक्षा वाढवली आहे. सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बुधवारी डॉ. जालिंदर सुपेकर यांनी रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक गोकूळ सोनोनी, भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर, लोहमार्गचे खलील शेख आदी अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक बोलावली आहे.

बॉम्बच्या अफवेने खळबळ

जळगाव शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात बॉम्बस्फोट झाल्याची अफवा आज पसरविण्यात आली. दिवस उजाडल्यापासून जामनेर सहित जिल्ह्यातील इतर भागातून लोकप्रतिनिधींनी याबाबत चौकशी केली.