लाच स्वीकारताना अधिकाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

साक्री - दिघावे (ता. साक्री) शिवारातील डेअरी कंपनीच्या नावे खरेदी करण्यासाठी व डेअरीलगतची तीन एकर जमीन तक्रारदाराच्या नावे खरेदीसाठी सहा लाखांची मागणी करून, तडजोडीअंती दोन लाखांची लाच स्वीकारताना येथील प्रभारी दुय्यम निबंधक परशराम काशिनाथ अहिरे, कनिष्ठ लिपिक अशोक ईश्वरलाल सोनकांबळे; तसेच दीपक कृष्णा ठाकूर यांना गुरुवारी अटक करण्यात आली. साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करायचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

दिघावे शिवारातील डेअरी तक्रारदारांच्या कंपनीच्या नावे खरेदी करावयाची होती. याच डेअरीलगतची तीन एकर जमीन त्यांना त्यांच्या नावे करावयाची होती. यासाठी तक्रारदार व त्यांचे मित्र साक्री येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गेले असता, त्यांच्याकडे लाच मागण्यात आली.

टॅग्स