कांद्याचे दर कोसळल्याने सटाण्यात "रास्ता रोको'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सटाणा (जि. नाशिक) - केंद्र शासनाने 31 डिसेंबरपासून कांदा निर्यात अनुदान बंद करण्याची घोषणा केल्याने आज येथील बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव कोसळले. त्यामुळे संतप्त झालेल्या कांदाउत्पादक शेतकऱ्यांनी विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तब्बल चार तास ठिय्या देऊन "रास्ता रोको' आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक दुतर्फा ठप्प झाली होती. शासनाने या निर्णयाचा फेरविचार करून कांद्याला 1500 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करावा. अन्यथा 25 डिसेंबरपासून तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.

सटाणा बाजार समितीत आज सकाळी बाजार लिलाव सुरू झाल्यानंतर निर्यातदार व्यापाऱ्यांनी लिलावाकडे पाठ फिरविल्यामुळे कांद्याचे भाव 250 ते 300 रुपये प्रतिक्विंटल दराने गडगडले. हा प्रकार शेतकऱ्यांचा लक्षात येताच त्यांनी लिलाव बंद पाडले. यानंतर शेतकऱ्यांनी विंचूर - प्रकाशा महामार्गावर कांद्याची वाहने आडवी लावून ठिय्या दिला. या वेळी शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी केली.

उत्तर महाराष्ट्र

सोनगीर (धुळे) - दहा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असलेल्या मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे येत्या चार - पाच महिन्यांत उद्घाटन होईल, ...

06.42 PM

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : येथील पोलिस ठाण्यात नुकतीच शांतता समिती व गणेश मंडळांच्या सदस्यांची बैठक संपन्न झाली. सहाय्यक...

12.00 PM

धुळे : देऊर परिसरातील भारतीय जीवन विमा निगम ग्राहकांनी सर्व प्रकारच्या  नवीन पाॅलीसी ची माहितीसह, जुन्या पाॅलिसींची...

10.57 AM