‘ऑनलाइन इंटरव्ह्यू’प्रणालीचा ‘स्मार्ट’ वापर!

भूषण श्रीखंडे
गुरुवार, 16 मार्च 2017

जळगाव - स्मार्टफोनद्वारे साऱ्या जगातील माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध होत असताना, आता विविध कंपन्यांच्या माध्यमातून रिक्त पदे भरण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या मुलाखती (इंटरव्ह्यू) ऑनलाइन घेण्याकडे कल वाढला आहे. मोठ्या कंपन्या ‘कॅम्पस इंटरव्ह्यू’द्वारे भरती करीत असतात. मात्र, लहान शहरांपर्यंत पोहोचू न शकणाऱ्या छोट्या कंपन्या या ‘ऑनलाइन इंटरव्ह्यू’द्वारे उमेदवारांची निवड करण्यावर भर देत आहेत.

गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानातील क्रांतीने इंटरनेटसह प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन दिला. जगभरातील माहिती, विविध कंपन्यांच्या भरतीच्या जाहिराती, शिक्षण संस्था व तेथील अभ्यासक्रमांची माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध होऊ लागली. भारतासारख्या बेरोजगार तरुणांची प्रचंड संख्या असलेल्या युवा देशात अशा प्रकारचे तंत्रज्ञान व त्यासंबंधी सुविधा कमालीच्या उपयुक्त ठरत आहेत.

ऑनलाइन इंटरव्ह्यू
संगणक क्षेत्रातील काही कंपन्या, तज्ज्ञांनी ‘ऑनलाइन इंटरव्ह्यू’प्रणाली विकसित करून ती उपलब्ध करून दिली आहे. याद्वारे कंपन्यांमध्ये रिक्त पदांची भरती करण्याकडे कंपन्यांचा कल वाढत चालला आहे. संगणक क्षेत्रातील कंपन्यांनी अशा प्रकारे ‘ऑनलाइन इंटरव्ह्यू’ची सेवा देण्यासाठी विविध प्रणाली विकसित केल्या आहेत.

वेळेसह पैशांची बचत
‘ऑनलाइन इंटरव्ह्यू’प्रणालीमुळे कंपन्यांचा उमेदवाराची भरती घेण्यासाठी होणारा खर्च वाचतो. त्या उमेदवाराचे कंपनीपर्यंत जाण्या- येण्याचे पैसे आणि दोघांचाही वेळ वाचतो. त्यामुळे ‘ऑनलाइन इंटरव्ह्यू’ संकल्पना कॉर्पोरेट जगतात कमालीची उपयुक्त ठरत आहे.

‘इंटरव्ह्यूएअर’ची संकल्पना!
मुंबईतील ‘इंटरव्ह्यूएअर’ या कंपनीने तरुणांना आपला प्राथमिक इंटरव्ह्यू रेकॉर्ड करून तो संबंधित कंपनीकडे पाठविण्याचे पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून कंपनीने काही कंपन्यांशी ‘टायअप’ केला आहे, तर महाविद्यालयांना ‘डोमेन’ म्हणून नोंदणी करून घेतली आहे. या कंपनीकडे जे विद्यार्थी, तरुण आपले नाव नोंदवतील, त्यांना विविध कंपन्यांच्या भरतीबद्दलच्या जाहिराती या पोर्टलवरून उपलब्ध होतात. कंपन्यांकडे ‘रिझ्यूम’ दिल्यानंतर कंपनी पोर्टलवरच उमेदवाराला इंटरव्ह्यूसाठी कॉल करते. उमेदवाराने आपला प्राथमिक चार मिनिटांचा इंटरव्ह्यू रेकॉर्ड (व्हिडिओ) करायचा व पोर्टलवर टाकायचा. तो इंटरव्ह्यू कंपनीला मिळाल्यानंतर पात्र ठरल्यास कंपनी उमेदवाराला ‘फायनल इंटरव्ह्यू’साठी बोलावते, अशी ही संकल्पना आहे.

Web Title: online interview process smart use