सटाणा पालिकेच्या आरमनदीतील उद्भव विहिरीच्या खोलीकरणाचा शुभारंभ

सटाणा पालिकेच्या आरमनदीतील उद्भव विहिरीच्या खोलीकरणाचा शुभारंभ

सटाणा - सटाणा शहरास पाणीपुरवठा करणारी मळगाव बंधाऱ्याजवळील उद्भव विहीर खोल करून या योजनेला ग्रामीण फिडर ऐवजी शहरी फिडरवरून वीजपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे शहरवासीयांसाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार असून टंचाई दूर होणार असल्याची माहिती पालिकेचे पाणीपुरवठा सभापती राहुल पाटील यांनी येथे दिली.

आज येथील देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिरामागील आरम नदीपात्रात पालिकेच्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचा वीजपुरवठा ग्रामीण फिडरवरून शहरी फिडरवर स्थलांतरीत करण्याचे काम सुरु झाले. यावेळी श्री. पाटील बोलत होते. नगराध्यक्ष सुनील मोरे, उपनगराध्यक्ष संगीता देवरे, गटनेते काकाजी सोनवणे, दिनकर सोनवणे, राकेश खैरनार, मुख्याधिकारी हेमलता डगळे प्रमुख पाहुणे होते. श्री. पाटील म्हणाले, पालिकेच्या मालकीच्या आरम नदीकिनाऱ्यालगत चार उद्भव विहिरी असून या सर्व विहिरींची खोली गेल्या कित्येक वर्षांपासून ५० ते ५५ फुटांपर्यंतच आहे. त्या तुलनेत परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरी ह्या १०० पेक्षा अधिक फुट खोल गेल्या आहेत. टंचाई काळात पालिकेच्या विंधनविहिरी लवकर तळ गाठतात व खासगी विहिरींना मात्र मुबलक पाणी दिसते. त्यामुळे आपल्या उद्भव विहिरींचे खोलीकरण १०० फुटांपर्यंत करण्याचा निर्णय घेतला. खोलीकरणाबरोबरच्या विहिरींना आडवे बोअरही केले जाणार आहे. या पाणी योजनेच्या विहिरींना वीज वितरण कंपनीच्या ग्रामीण फिडरवरून विद्युत पुरवठा केलें असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत होते. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण होत होत्या. आता शहरी फिडर वर वीज जोडणी स्थलांतरीत करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे आता मळगाव बंधारा विहिरींना २४ तास वीजपुरवठा होईल व पुरेसा पाण्याचा उपसा करणे शक्य होणार असल्याचेही श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.

यावेळी बांधकाम सभापती सुनिता मोरकर, आरोग्य सभापती दीपक पाकळे, महिला बालकल्याण सभापती निर्मला भदाणे, शिक्षण सभापती शमा मन्सुरी, नगरसेविका पुष्पा सूर्यवंशी, डॉ. विद्या सोनवणे, आशा भामरे, पाणीपुरवठा अभियंता राकेश पावरा, संजय सोनवणे, दत्तू बैताडे, नाना मोरकर, दीपक नंदाळे, पाणीपुरवठा अधीक्षक संजय सोनवणे, आनंदा सोनवणे आदींसह नागरिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com