आज रात्री बारापर्यंत थकीत कर भरण्याची संधी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

नाशिक - आज (ता. 14) शासकीय सुटी असली तरी नागरिकांच्या सोयीसाठी सकाळी आठ ते रात्री बारापर्यंत जुन्या नोटांद्वारे घरपट्टी, पाणीपट्टीसह विविध कर भरता येणार आहेत. मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांवर मंगळवार(ता. 15)पासून जप्ती मोहीम, तर पाणीपट्टी थकविणाऱ्यांचे नळजोडणी खंडित केली जाणार आहे. दरम्यान, काल सायंकाळी सहापर्यंत एक कोटी 37 लाख 25 हजार कररूपाने भरणा झाला. 

पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद ठरविल्याचा निर्णय जाहीर झाला असला, तरी नागरिकांच्या सोयीसाठी कर भरण्याकरिता जुन्या नोटांचा वापर चालणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेच्या विभागीय कार्यालयांमध्ये करभरणा करण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली आहे. आज (ता. 14) गुरू नानक जयंती, तसेच पं. जवाहरलाल नेहरू यांची जयंती असल्याने शासकीय कार्यालयांना सुटी आहे. पण नागरिकांच्या सुविधेसाठी आज सकाळी आठ ते रात्री बारा या कालावधीत कर भरता येणार आहे. त्यासाठी चलनातून बाद ठरविलेल्या पाचशे व हजाराच्या नोटादेखील चालणार आहेत. 

साडेबारा कोटींचा कर जमा 

काल सकाळी कार्यालय सुरू झाल्यापासून सायंकाळी सहापर्यंत मालमत्ता कराच्या रूपाने 96 लाख 82 हजार रुपये, पाणीपट्टीच्या रूपाने 28 लाख 18 हजार रुपये, तर विविध करांच्या रूपाने 12 लाख 25 हजार रुपये, असा एकूण एक कोटी 37 लाख 25 हजारांचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. आतापर्यंत 12 कोटी 43 लाख 72 हजार रुपये कररूपाने महापालिकेच्या तिजोरीत आले. 

टॅग्स