पिस्तुलाचा धाक दाखवून नाशिकमधून मोटार पळवली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

घोटी (नाशिक) - मुंबई-नाशिक महामार्गालगत घोटी-सिन्नर फाट्यावर रात्रीच्या वेळी वाहनचालकास पिस्तुलाचा धाक दाखवून मोटार पळविल्याचा प्रकार घडला.

घोटी (नाशिक) - मुंबई-नाशिक महामार्गालगत घोटी-सिन्नर फाट्यावर रात्रीच्या वेळी वाहनचालकास पिस्तुलाचा धाक दाखवून मोटार पळविल्याचा प्रकार घडला.

नाशिक येथील सातपूरचे वाहनचालक महिंद्रा धनराज साबळे (वय 30) हे मोटारीने (एमएच 41, व्ही 2516) मुंबई येथून परत येत असताना भिवंडी बाह्यवळणावर चार अनोळखी व्यक्तींनी नाशिकला नेण्यासाठी साबळे यांना विनंती केल्याने त्यांनी मोटार थांबवून प्रवाशांना घेतले. घोटीजवळील सिन्नर फाट्यावर रात्री साडेआठच्या सुमारास चौघांनी मोटार थांबविण्यास सांगितले. त्याच वेळी चालकाशेजारी बसलेल्याने साबळेंना पिस्तुलाचा धाक दाखवत मोटार संगमनेरच्या दिशेने नेण्यास भाग पाडले. संगमनेर शिवारात साबळे यांना उतरवून त्यांच्याकडील दोन हजार 800 रुपये आणि मोबाईल काढून घेतला. त्यानंतर चौघांनी मोटार घेऊन पोबारा केला. याबाबत घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील तपास करत आहेत.