बिबट्याची दहशत चौथ्या दिवशीही कायम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

वन विभागाने जलविज्ञान भवनाजवळ लावला पिंजरा
पंचवटी - दिंडोरी रोड परिसरात रविवारी (ता. २०) सायंकाळी वाहनचालकाला दिसलेल्या बिबट्याची दहशत आज चौथ्या दिवशीही कायम होती. काल या भागात मृत कुत्र्याचे अवशेषासह बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले असले, तरी वन विभागाने बिबट्याच्या अस्तित्वाबाबत अद्याप दुजोरा दिलेला नाही. सलग चार दिवस शोध घेऊनही न आढळलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आज सायंकाळी जलविज्ञान भवन परिसरात पिंजरा लावला.

स्कार्पिओचालकास रविवारी (ता. २०) रस्ता ओलांडून मेरी कार्यालय परिसरात शिरलेला बिबट्या दिसल्यापासून पोलिस, वन विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र, मृत कुत्रा व पायाचे ठसे आढळूनही वन विभाग बिबट्याच्या अस्तित्वाबाबत साशंक आहे. बिबट्या पुन्हा सोमवारी (ता. २१) एका शाळकरी मुलीला दिसल्याचा दावा तिच्या पालकांनी केला. मात्र, यास अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. तरीही या भागातील रहिवासी, सकाळी व सायंकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

सुरक्षिततेसाठी खबरदारी
एखाद्या भागात बिबट्या किंवा अन्य हिस्त्र प्राणी नागरिकांना प्रत्यक्ष दिसला किंवा प्राण्याच्या पायाचे ठसे किंवा विष्ठा आढळून आल्यास पिंजरा लावण्याची वन विभागाची पद्धत आहे. येथे तसे काही न आढळल्याने वन विभाग संभ्रमात होते. मात्र, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी म्हणून पिंजरा लावल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आज सायंकाळी मृत कुत्र्याचे अवशेष आढळले होते. त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला. तेथे पाण्याची टाकी असून, मोठ्या प्रमाणावर पाणीही उपलब्ध असल्याने पाणी पिण्यासाठी बिबट्या  येऊ शकतो, अशी शक्‍यताही व्यक्त करण्यात आली.

उत्तर महाराष्ट्र

नाशिक - पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर ठाणे अंमलदाराकडून तक्रार दाखल करून घेतली जाईलच याची खात्री नसते....

01.27 AM

भुसावळ : येथील बांधकाम व्यवसायिक म्हणून परिचित असलेल्या सानिया कादरी यांच्या घरावर एैनपूर येथील संतप्त शेतकऱ्यांनी आज (...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील आरोग्य केंद्रात रुग्णांसह ग्रामस्थांना अजूनही पुरेशा...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017