पूर ओसरल्यानंतर गंगाघाटावरील जीवन पूर्वपदावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

पंचवटी - पावसाने आज उघडीप दिल्याने गंगापूर धरणातील विसर्ग कमी करण्यात आला. त्यामुळे पाणीपातळी घटली असून, गंगाघाटावरील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. महापालिका प्रशासनातर्फे नदीकिनारी वाहून आलेला गाळ साफ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दमदार पाऊस झाल्यानंतर गंगापूर धरणात ७६ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक जलसाठा झाल्यावर पाटबंधारे विभागाकडून नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. त्यामुळे रामसेतूसारखे छोटे-मोठे पूल व सांडवे पाण्याखाली जाऊन पूरस्थिती निर्माण झाली. परिणामी नदीकाठचे जनजीवनही विस्कळित झाले. गाडगे महाराज पूल, अहिल्यादेवी होळकर पुलावर पूर पाहण्यासाठी गर्दी उसळली होती.

पाणीपातळीत वाढ झाल्याने श्राद्धादी विधी भाविकांना नदीकिनारी जागा मिळेल तेथे उरकावे लागत होते. 

रामकुंड परिसर चकाचक
कपालेश्‍वराचे धार्मिक महत्त्व लक्षात घेत महापालिका प्रशासनातर्फे काल रामकुंड परिसराची साफसफाई करण्यात आली. परिसरात वाहून आलेला गाळ व चिखल जेसीबीद्वारे साफ करण्यात आला. 

मोठ्या प्रमाणावर गाळ वाहून येऊनही अवघ्या काही तासांत रामकुंड परिसराची साफसफाई करण्यात आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. श्रावणाचे औचित्य साधत कपालेश्‍वरासह काळाराम व अन्य मंदिरांत दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे.