‘यिन’तर्फे पांजरापोळ संस्थानात स्वच्छता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून राबविली मोहीम
जळगाव - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शहरात विविध कार्यक्रमांद्वारे साजरी करण्यात आली. यात ‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’तर्फे (यिन) आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शहरातील पांझरापोळ संस्थानचा परिसर स्वच्छ करण्यासोबतच गायींना चारा देऊन गोसेवाही करण्यात आली.

‘सकाळ’च्या ‘यिन’चे महसूलमंत्री जिनल जैन यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांनी डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबविण्याचे निश्‍चित केले होते. त्यानुसार आज सकाळी आठला पांजरापोळ संस्थान परिसरात मोहीम राबविण्यात आली. एखादी मोहीम यशस्वी करण्याचा निश्‍चय केल्यास ती यशस्वी करून दाखविण्याचे काम ‘यिन’च्या सदस्यांनी केले. यात पांजरापोळ संस्थान परिसरात निर्माल्य तसेच सभोवतालचा परिसर स्वच्छ केला. तसेच गोसेवा करीत गायींना चारा टाकण्याचेही काम सदस्यांनी केले. साधारण दोन तास ही मोहीम राबविली. मोहीम यशस्वितेसाठी महसूलमंत्री जैन, लोकसेवा संकल्पचे विष्णू असोपा, शुभम राणा, भाग्येश त्रिपाठी, लक्ष्य भामरे, सुरण माळी, योगेश करंदीकर, मिलिंद मलबारी, अमित नवघरे, साहील खान, गौरव मराठे, तेजस पाटील, संदीप यादव तसेच ‘यिन’ समन्वयक बापूसाहेब पाटील यांचे सहकार्य लाभले.

Web Title: panjarapol sansthan cleaning by yin