विनाहेल्मेट चालकांवर दंडात्मक कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

नाशिक - गेल्या महिन्याभरात शहरात रस्ता अपघातामध्ये तीन महिलांसह 17 जणांचा मृत्यू झाला असून, दुचाकीचालकांसाठी गत सहा महिन्यांपासून जनजागृती व दंडात्मक मोहीम राबविली गेली. आज वाहतूक पोलिस शाखेने मुंबई नाका येथे पुन्हा अनोखी मोहीम राबविली. या वेळी विनाहेल्मेट दुचाकीचालकांना हेल्मेट विकत आणा अन्यथा 500 रुपयांचा दंडा भरा, अशीच मोहीम राबविली गेली. 

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी शहरातील वाढत्या रस्ता अपघातावर लक्ष केंद्रित करून हेल्मेट न वापरणाऱ्यांवर दुप्पट दंड आकारणी केली. जनजागृतीपर उपक्रम राबविण्यावरही भर दिला. त्यासाठी वाहतूक सप्ताहामध्ये निबंध लेखन, भविष्यवाणी अशा स्वरूपाचे उपक्रमही राबविले. पण, त्यानंतर गेल्या महिन्याभरात तब्बल 17 जणांचा मृत्यू डोक्‍यात हेल्मेट नसल्याने झाला आहे. आज वाहतूक पोलिस शाखेचे सहाय्यक आयुक्त जयंत बजबळे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई नाका येथे हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी चालकांविरोधात कारवाई केली. या वेळी दंड भरा किंवा हेल्मेट आणा, असे दुचाकीचालकांसमोर पोलिसांनी दोन पर्याय ठेवले. पहिला पर्याय हा 500 रुपयांचा दंड भरण्याचा, तर दुसरा पर्याय हा हेल्मेट विकत घेऊन येणे व ते विकत घेतल्याची पावती दाखविणे. त्यामुळे कारवाईमध्ये सुमारे 25 ते 30 दुचाकीचालकांनी मुंबई नाका परिसरातून हेल्मेट विकत घेतले आणि ते पोलिसांना दाखविले. त्या वेळी त्यांचे वाहन सोडून देण्यात आले. काही चालकांना हेल्मेट घरी वा कार्यालयात असेल, तर त्यांना ते आणावयास भाग पाडले. त्यानंतरच त्यांना वाहनांचा ताबा दिला. तसेच, ज्यांच्याकडे हेल्मेट नाही त्यांना दंड भरण्यासही भाग पाडले. 

Web Title: Penalties on operators without helmet