सहा महिन्यांच्या थरारानंतर आले यश

सहा महिन्यांच्या थरारानंतर आले यश

पिलखोड (ता. चाळीसगाव) - गेल्या सहा महिन्यांच्या थरारानंतर नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला यश आले. यामुळे भीतीच्या छायेत वावरणाऱ्या शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. 

जीव मुठीत धरून गेल्या सहा महिने गिरणा परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी काढले आहेत. नोव्हेंबर महिन्यात तर बिबट्याच्या धाकाने शेत शिवार अक्षरशः ओस पडायला लागला होता. बिबट्यामुळे शेतीचे कामे खोळंबली होती. मजूर शेतात जाण्यास धजावत नव्हते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागली आहे. तर बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या कुटुंबीयांना आपल्या एका सदस्याला कायमचे मुकावे लागले आहे. बिबट्याला पकडण्यास वन विभागाला वारंवार अपयश होते. शिवाय त्यांच्या कामात अडथळा निर्माण होईल, असेही प्रसंग क्षणोक्षणी येत होते. बऱ्याचदा राजकीय पुढाऱ्यांच्या मागे पुढे वन कर्मचाऱ्यांना आपले काम सोडून फिरावे लागायचे तर अनेकवेळा रात्रीच्या सुमारास वन कर्मचारी काम करीत असताना ग्रामस्थांच्या गर्दीचा त्रासही झाला आहे.

शेतात बस्तान बसवून राहत असलेले शेतकरी कुटुंबीय तर कमालीचे भयभीत होऊन जगत होते. गुरांबरोबरच स्वतःच्या प्राणांची बाजी लावून ते शेतात राबत होते. बिबट्याने वन विभागाच्या दीडशे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाला नाकीनऊ आणले होते. अखेर बिबट्याला शूट करण्यात यश आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com