कुल्फी खाल्याने ५५ जनांणा विषबाधा

कुल्फी खाल्याने ५५ जनांणा विषबाधा

अंबासन - परिसरातील बहिराणे, चिराई व महड येथे कुल्फी खाल्याने जवळपास ५५ जनांना विषबाधा झाली असून, यात सर्वाधिक लहान मुलांचा समावेश आहे. त्यांना नामपूर येथील ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विषबाधा झालेल्या या सर्व मुलांची प्रकृती आता स्थिर असल्याचे येथील वैद्यकीय आधिकारी डाॅ. सुनील मोराणकर सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बागलाण तालुक्यातील बहीराणे, महड, चिराई येथे काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास सायकलीवरून परप्रांतीय फेरीवाला कुल्फी विकण्यासाठी या परिसरात आला होता. उन्हाच्या झळा अधिक वाढल्याने ग्रामिण भागात परप्रांतीय कुल्फीवाले मोसमसह काटवन परिसरात दाखल झाले आहेत. फेरीवाल्यांनी संपूर्ण परिपरिसरातील गाव कुल्फी विक्रीसाठी नेमुन घेतली आहेत. तसेच लग्नसईतही परप्रांतीय फेरीवाले दिसून येत आहेत. तिनही गावातील लहान मोठ्यांनी संबंधित कुल्फी विक्रेत्याकडून काल दुपारी मटका कुल्फी खाल्ली होती. त्यानतंर सायंकाळी अचानक तिनही गावामध्ये लहान मोठ्या मुलांना व कुटूंबातील सदस्यांना उलट्या, मळमळ, जुलाब याचा त्रास जाणवू लागल्याने एकच खळबळ उडाली. गावातील लोकांनी तात्काळ नामपूर ग्रामीण रुग्णालयाच्या १०८ रूग्णवाहिकेला पाचारण करून रात्री आठ वाजेच्या सुमारास ग्रामीण रूग्णालयात विषबाधित रूग्णांना दाखल केले. तर अनेकांनी खाजगी वाहनातून रूग्णांना दाखल केले. वैद्यकीय आधिकारी व कर्मचा-यांनी त्वरित दखल घेऊन उपचार सुरू केले. रात्रभर विषबाधेचे रूग्ण दाखल होत होते. पहाटेपर्यंत रूग्णांची संख्या तीसवर पोहचली होती. तरीही रूग्ण वाढतच होते. दुपारनंतर एकुण ५५ विषबाधेचे रूग्ण दाखल झाले होते.

रूग्णालयात प्रत्येक खाटेवर दोन-दोन रूग्णावर उपचार सुरू होते. यात सिंधुबाई लोटन आहिरे (५५), भरत दगा आहिरे  ( ३३), चेतन भरत आहिरे  (५), कुसुमबाई दगा आहिरे (४५), सोनाली भरत आहिरे  (२२), कल्पना पावला खैरनार  (२४), पृथ्वीराज पावला खैरनार (४), नंदीनी जनक निकुंभ (४०), सुनिता भास्कर शिंदे (२२), हर्षदा भास्कर शिंदे  (६), निकीता गुलाब आहिरे (१०), मनोहर मधुकर धोंडगे (१०), इशांत विनायक धोंडगे (८), वैष्णवी विनायक धोंडगे (१२), प्रसाद दादाजी धोंडगे (६), मेघश्याम दादाजी धोंडगे (४), गिरीश वाल्मिक धोंडगे  (९), भैरव वाल्मिक धोंडगे (६), अमोल शरद सोनवणे  (५), गोकुळ शरद सोनवणे (४), नंदिनी दादाजी आहिरे  (४), धनश्री दादाजी आहिरे (२), मोहीत संजय आहिरे  (१३),भावेश किशोर आहिरे  (१०), लोकेश किशोर आहिरे  (१३), इंद्रजित हरी आहिरे  (१३), गजानन विलास आहिरे  (१२), रोशनी तुकाराम आहिरे  (१३), कल्यानी विजय आहिरे (९), पुजा संजय आहिरे  (११),प्रशांत सदाशिव जाधव (१२), सनी सदाशिव जाधव (१०), मंगला सदाशिव जाधव (३०),महेश कौतिक आहिरे (८), सोनाली कौतिक आहिरे  (२२), सरला दिलीप आहिरे (१४),नयना दिलीप आहिरे  (९),सोनाली दिलीप आहिरे  (१२), दिपाली दिलीप आहिरे (१४),माधुरी दिलीप आहिरे  (६),अर्चना अशोक आहिरे  (१३),सुमन हरीभाऊ बोरसे (४०),वैशाली अशोक आहिरे  (१२),लकी युवराज आहिरे  (५),सुवर्णा चिंतामण आहिरे  (२२), या सर्वंना उपचारासाठी नामपूर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. या शिवाय आणखी काही मुलांना देखील विषबाधा झाली असून, त्यांना उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद नामपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीराम कोळी व एम.डी.मोरे करीत आहेत. दरम्यान परिसरातील कुल्फी विक्रेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असुन यातील अखिलेश रामप्रसाद कुमावत हा या तिनही गावात कुल्फी विकण्यासाठी गेला होता. नागरिकांना त्याची ओळख पटल्याने त्याला ताब्यात घेतले आहे.

काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास फेरीवाला आला व त्याच्याकडून कुल्फी खाल्या एक ते दोन तासातच लहान मुलांना त्रास जाणवू लागला त्यानतंर तसाच त्रास गावातील मुलांना जाणवला लगेचच बहीराणे, चिराई, महड गावात भ्रमरध्वनी केले तेथेही तीच अवस्था होती. १०८ रूग्णवाहीकेला फोन करून नामपूर ग्रामीण रुग्णालय रात्री आठ वाजता दाखल केले. डाॅक्टरांनी लगेच उपचार सुरू केले.

- राजेंद्र आहिरे, रूग्णाचे पालक चिराई.

रात्री तीस ते पस्तीस विषबाधेचे रूग्ण दाखल झाले. सर्वांना उलटी, जुलाब, मळमळ अशा प्रकारची लक्षणे दिसून आले कुल्फी खाल्याचे निदर्शनास आले. सध्या रूग्णांची प्रकृती स्थिर आहे.

- सुनिल मोराणकर. वैद्यकीय आधिकारी नामपूर ग्रामीण

अंबासन - कुल्फी खाल्याने विषबाधा झालेल्या रूग्णांची तपासणी करताना वैद्यकीय आधिकारी. दुस-या छायाचित्रात पालकांनी रूग्णालयात केलेली गर्दी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com