चाळीसगाव : मेहुणबारे पोलिसांचा वडगावला दारू अड्ड्यावर छापा

चाळीसगाव : मेहुणबारे पोलिसांचा वडगावला दारू अड्ड्यावर छापा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : येथील पोलिसांनी अनाधिकृतरित्या गावठी दारू विक्रेत्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. आज सकाळी सातला वडगाव लांबे (ता.चाळीसगाव) येथे  हातभट्टीवर छापा टाकून सुमारे 92 हजार रूपये किमतीचे रसायन जप्त करून जागेवर नष्ट केले. या कारवाईचे महिलांमधून स्वागत होत आहे.

मेहुणबारे पोलिस ठाण्याअंतर्गत 55 गावे आहेत. यापैकी बहुतांश गावांमध्ये गावठी दारूसह देशी विदेशी बनावट मद्याची सर्रास विक्री होत आहे. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याने गावागावांतील महिलांनी दारू बंदीची मागणी केली आहे. येथील पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी रूजू होताच अवैध धंदेवाल्यांनवर  कारवाईचा बडगा उगारला. १३ सप्टेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास वडगाव लांबे (ता.चाळीसगाव)  येथील खार्या नाल्या जवळ गावठी हातभट्टीवर दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. हीरे यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून तेथे छापा टाकला असता 65 हजार रूपयांचा गुळ व नवसागर मिश्रित कच्चे रसायन जप्त करून जागेवर नष्ट केले. दोन हजार रूपयांची तयार दारू त्या ठिकाणी असलेली पॅजो रिक्षा क्रमांक (एम.एच.02.सी.डी.3613) जप्त करण्यात आली. कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक जयपाल हीरे, छबुलाल नागरे, गोरख चकोर,शैलेश माळी, सिध्दांत शिसोदे यांनी ही कारवाई केली.

याबाबत हवालदार शैलेश माळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी उमेश रामा ठोंबरे, (राहणार मालेगाव रोड चाळीसगाव) रमेश भगवान पवार,(रा.खडकी ता.चाळीसगाव) या दोघा संशयीतांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सट्टेबाजांवर कारवाई 
मेहुणबारे आठवडे बाजारात  गणेश उत्सवाच्या पुर्व संधेला  चोरून लपुन सट्टा जुगार सुरू असल्याचे जयपाल हिरे यांना कळताच  दोन पथक तयार करून एकाचवेळी छापा टाकला. दोन्ही गुन्ह्यांत 7 हजार 410  रुपये रोख, 10 हजार रूपये किंमतीचा मोबाईल 25 हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा सुमारे  33 हजार 410 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्ह्यातील संशयीत आरोपींच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महिलांकडून कारवाईचे स्वागत
ग्रामीण भागात खुलेआम विकल्या जाणाऱ्या गावठी दारूमुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो.अनेक गावामध्ये ग्रामसभा घेऊन दारूबंदीचे ठरावदेखील केले आहेत.या ठरावांना प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. काही ठिकाणी तर आपले मतदान कमी होईल म्हणून स्थानिक पुढारीच अवैधरीत्या दारू विक्री करणार्यांची पाठराखण करतात. अनेक गावांत आजही अनाधिकृतरित्या दारू विक्री होत असल्याने श्री. हिरे यांनी कारवाईत सातत्य कायम ठेवावे 

परिसरात कुठेही अवैध धंदे सुरू असतील तर पोलिसांना तातडीने कळवावे.जेणकरूण कारवाई करता येईल. याकामी ग्रामस्थानी पोलिसांना सहकार्य करावे. प्रत्येक गावात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अवैध धंदेवाल्यांनवर कारवाया सुरूच राहतील.
- जयपाल हिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मेहुणबारे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com