अल्पवयीन मुलीवर पोलिसाचा बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

नाशिक - मोहाडी (ता. दिंडोरी) येथे काल (ता. 3) रात्री अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिस शिपायाला अटक झाली. आज त्याला न्यायालयात हजर केले असता, येत्या शुक्रवार (ता. 7) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. गोरख मधुकर शेखरे (वय 25) असे त्याचे नाव असून, तो टेलिफोन कॉलनी, दिंडोरी येथील रहिवासी व भायखळा (मुंबई) पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.

गोरख सुटीमुळे गावी आला होता. मोहाडी येथील नववीत शिकणाऱ्या पंधरावर्षीय पीडित मुलीशी त्याची ओळख होती. काल रात्री साडेनऊच्या सुमारास ही मुलगी घरासमोर भांडी घासत होती. त्या वेळी गोरख तेथे आला. त्याने तिला जवळच्याच बाथरूममध्ये ओढून नेत बलात्कार केला. पीडित मुलीने कसेबसे स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवून घेतल्यानंतर आरडाओरड केली. तिच्या पालकांनी धाव घेत तिला सावरले. तोपर्यंत संशयित शेखरे बाथरूममध्येच लपून बसला होता. पालकांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले. गोरख शेखरे मद्यधुंद अवस्थेत होता, अशी चर्चा आहे. त्याने यापूर्वी मुंबईतही गैरवर्तन केल्याने त्याच्यावर कारवाई झाल्याचे समजते.