गोदा प्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांचेही पथक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

नाशिक - शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रात प्रदूषण रोखण्यासाठी पोलिसही सरसावले आहेत. ज्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून गोदापात्र येते, त्या-त्या पोलिस ठाण्याचे एक अधिकारी व पाच कर्मचाऱ्यांचे एक पथक प्रदूषण रोखणार आहे. याप्रमाणे पाच पोलिस ठाण्यांचे पाच अधिकारी, 20 पोलिस व पाच महिला पोलिसांची गोदाप्रदूषण संरक्षक समिती तयार करण्यात आली आहे. 

गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. नदीपात्रात वाहनांच्या साफसफाईसह कपडे धुतले जातात. त्यामुळे गोदापात्रात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन पवित्र नदी प्रदूषित झाली आहे. यासंदर्भात न्यायालयातही खटले सुरू आहेत; तर उच्च न्यायालयाने पोलिसांना गोदावरी नदीपात्रात प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. त्यानुसार, गेल्या वर्षभरात 56 जणांवर गोदावरी नदीपात्रात प्रदूषण केल्याप्रकरणी गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. या वेळी पोलिस आयुक्‍तालयातर्फे गोदावरी प्रदूषण संरक्षक समिती करण्यात आली आहे. यात ज्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून गोदावरी नदीचे पात्र प्रवाहित होते, त्या पोलिस ठाण्याचे एक अधिकारी व पाच पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. याप्रमाणे गंगापूर, सरकारवाडा, पंचवटी, भद्रकाली आणि आडगाव या पोलिस ठाण्यांचे पाच पोलिस उपनिरीक्षक, 20 पोलिस कर्मचारी व पाच महिला पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या-त्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गोदावरी पात्रात प्रदूषण करणाऱ्यांवर त्या-त्या पोलिस ठाण्याच्या पथकाकडून गुन्हे दाखल करून कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या प्रदूषणाला आळा बसणे शक्‍य होईल, तसेच माहितीही आयुक्तालयातर्फे वरिष्ठ स्तरावर पाठविली जाणार आहे. 

Web Title: The police team to prevent pollution godavari river