महापालिका निवडणुकीसाठी एक हजार 407 मतदान केंद्रे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

विभागनिहाय मतदान केंद्रांची संख्या 
पंचवटी- 291, नाशिक पश्‍चिम- 142, सातपूर- 154, नाशिक रोड- 263, पूर्व- 290, सिडको- 267 याप्रमाणे एकूण एक हजार 407 मतदान केंद्रे राहणार आहेत. 

नाशिक - अपक्ष उमेदवारांना चिन्हवाटप झाल्यानंतर प्रशासनाने निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून मतदान केंद्रांची निश्‍चिती केली आहे. त्यानुसार शहरात एकूण एक हजार 407 मतदान केंद्रांची निर्मिती केली जाईल. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या प्रभाग 13 मध्ये सर्वाधिक 61, तर सर्वांत कमी लोकसंख्या असलेल्या प्रभाग 10 मध्ये 31 मतदान केंद्रे आहेत. 

निवडणुकीसाठी साडेचार हजार मतदान यंत्रांचा वापर केला जाईल. यात बहुतांशी मतदानयंत्रे ही नगर जिल्ह्यातून मागविण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या सनियंत्रण समितीच्या तपासणीनंतर मतदान केंद्रांची संख्या अंतिम केली जाईल. एका मतदान केंद्रावर सरासरी साडेसातशे ते आठशे मतदारांना मतदान करता येईल. बहुसदस्यीय प्रभागपद्धती असल्याने उमेदवारांची संख्या जास्त राहणार आहे. चार उमेदवारांना मतदान करताना किमान तीन ते चार मिनिटे वेळ लागणार आहे. मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्या घटविण्यात आली आहे. 

प्रभागनिहाय मतदान केंद्रांची संख्या 

प्रभाग मतदान केंद्रे 
1 40 
2 48 
3 51 
4 47 
5 50 
6 55 
7 47 
8 36 
9 39 
10 31 
11 48 
12 46 
13 61 
14 54 
15 42 
16 40 
17 52 
18 43 
19 38 
20 44 
21 46 
22 40 
23 43 
24 49 
25 54 
26 41 
27 34 
28 45 
29 50 
30 50 
31 43 
------------------------ 
एकूण 1407 

विभागनिहाय मतदान केंद्रांची संख्या 
पंचवटी- 291, नाशिक पश्‍चिम- 142, सातपूर- 154, नाशिक रोड- 263, पूर्व- 290, सिडको- 267 याप्रमाणे एकूण एक हजार 407 मतदान केंद्रे राहणार आहेत. 

Web Title: polling booth in nashik