pravin ahire speak on english language in dhule district
pravin ahire speak on english language in dhule district

मौखिक व लिखित स्वरूपात फरक असल्याने इंग्रजी भाषा अवघड : प्रवीण अहिरे

निजामपूर-जैताणे (धुळे) : मौखिक व लिखित स्वरूपात फरक असल्यानेच इंग्रजी भाषा इतर भाषांच्या तुलनेत विद्यार्थ्यांना अधिक अवघड वाटते, असे प्रतिपादन धुळ्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी केले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे व नाशिक विभागीय शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयात मराठी, हिंदी व इंग्रजी ह्या भाषा विषयांच्या शिक्षकांसाठी सोमवारी (ता.16) आयोजित एकदिवसीय कृतीपत्रिका प्रशिक्षण शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षण निरीक्षक जयश्री साळुंखे, प्राचार्य मनोहर पाटील, तज्ञ मार्गदर्शक प्रा. राजेंद्र अग्रवाल (साक्री), प्रा. विजय पाटील (धरणगाव), प्रा. अविनाश पाटील (अमळनेर), प्रा. जोगेश शेलार (चोपडा), प्रा. सुनील मोरे (दुगाव, चांदवड), प्रा. एच. व्ही. पाटील (म्हसदी), प्रा. बी. के. रौन्दळ (देवळा), प्रा. बी. एन. चौधरी (नाशिक), प्रा. बी. जी. वाल्हे (खापर), प्रा. अशोक ठोके (चांदवड), प्रा. मीना शिंदे (नाशिक), प्रा. जुनेद शेख (नामपूर), श्रीमती वाघुळदे (नाशिक) आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उदघाटन झाले. प्राचार्य मनोहर पाटील, प्रा. एच.व्ही. पाटील आदींनी मनोगते व्यक्त केली. प्रा. संजय देसले (शिरपूर) यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुदाम पाटील (रावेर) यांनी आभार मानले.

प्रशिक्षण शिबीर दोन सत्रात घेण्यात आले. चालू शैक्षणिक वर्षापासून बारावीला भाषा विषयांना प्रश्नपत्रिकेऐवजी कृतीपत्रिका असणार आहे. त्यासंदर्भात हे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. त्यात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. बी. ए. पाटील, सचिव प्रा. डी. पी. पाटील आदींसह जिल्ह्याभरातून कनिष्ठ महाविद्यालयांतील भाषा विषयांचे शेकडो शिक्षक सहभागी झाले होते. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना उपस्थिती पत्र व कृतीपत्रिका पुस्तिकांचेही वाटप करण्यात आले. पुढील शैक्षणिक वर्षापासून अकरावीचा अभ्यासक्रम बदलत असल्याचा खुलासाही यावेळी करण्यात आला. इंग्रजी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा. राजेंद्र अग्रवाल, प्रा. विजय पाटील, प्रा. अविनाश पाटील, प्रा. जोगेश शेलार यांनी काम पाहिले. मराठी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा. सुनील मोरे, प्रा. एच. व्ही. पाटील, प्रा. बी. के. रौन्दळ, प्रा. बी. एन. चौधरी, प्रा. बी. जी. वाल्हे यांनी काम पाहिले. तर हिंदी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा. अशोक ठोके, प्रा.मीना शिंदे, प्रा.जुनेद शेख यांनी कामकाज पाहिले. प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वीतेसाठी एसएसव्हीपीएस महाविद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, नाशिक विभागीय शिक्षण मंडळ व शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com