कांद्याच्या दराच्या झोक्‍याची दोन हजार रुपयांवर झेप 

कांद्याच्या दराच्या झोक्‍याची दोन हजार रुपयांवर झेप 

पिंपळगाव बसवंत - कांद्याच्या दराचा झोका आज दोन हजार रुपयांपर्यंत उंच झेपावला. तब्बल वर्षभरानंतर कांद्याने आकर्षक दरापर्यंत झेप घेतली. आवकेत झालेली मोठी घट व परराज्यात कांद्याचा हंगाम संपल्याने बाजारभावाने उसळी घेतली. 

कांद्याच्या दरात चार दिवसांपासून झळाळी आली आहे. गेल्या आठवड्यात कांद्याने दीड हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता. आज वधारलेल्या दरात तब्बल चारशे रुपयांची वाढ झाली. पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याच्या आवकेत घट होऊन दहा हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी आला. किमान 890 रुपये, कमाल दोन हजार 45 रुपये, सरासरी एक हजार 600 रुपये दर मिळाला. लाल कांद्याचे आगमनही दमदार बाजारभावाने झाले. शंभर क्विंटल लाल कांदा विक्रीला येऊन सरासरी एक हजार 400 रुपये क्विंटल भाव मिळाला. 

मध्य प्रदेश, राज्यस्थानातील कांद्याचा हंगाम लवकर गुंडाळला गेला आहे. त्यामुळे देशभरात कांद्याचा पुरवठा करण्याची भिस्त नाशिक जिल्ह्यावर आहे. त्यात नाशिकमध्येही शेतकऱ्यांच्या चाळीतील कांदा संपल्यात जमा आहे. अपुऱ्या पावसाने नवीन लाल कांद्याचे पीक अर्धाहून घटल्याने त्याचा परिणाम कांद्याच्या दरात वधारणा झाली आहे. कांदा व्यापारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सोहनलाल भंडारी म्हणाले, की बांगलादेश, आसाम, दिल्ली, पंजाबमध्ये कांद्याला मोठी मागणी आहे. आवकेत घट होऊन मागणी वाढल्यास दर पुढील टप्पा गाठू शकतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com