मुस्लिम आरक्षणासाठी  सोमवारी धरणे आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

नाशिक- मुस्लिम आरक्षणासाठी सोमवारी (ता. 20) आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले जाणार आहे. त्यानिमित्ताने येवला ते मुंबई सायकल प्रवास करणारे समितीचे येवला तालुकाध्यक्ष सलीम काझी काल (ता. 17) रात्रीच्या सुमारास शहरात दाखल झाले होते.

चौकमंडई येथे समितीचे प्रदेशाध्यक्ष अजीज पठाण व मुस्लिम बांधवांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. मुस्लिम आरक्षणासाठी मुस्लिम आरक्षण समितीकडून राज्य शासनाच्या विरुद्ध विविध प्रकारचे आंदोलन छेडले जात आहे. शासनाला जाग यावी यासाठी येवला तालुक्‍याचे समितीचे अध्यक्ष सलीम काझी यांनी काल सकाळच्या सुमारास येवला ते मुंबई असा सायकल प्रवास सुरू केला आहे. या वेळी रफिक शेख, इब्राहिम अत्तार, साज शेख, महमद कुरैशी, मोबीन शेख, शकील मन्यार, इम्रान बागवान, सईद पहेलवान आदी उपस्थित होते.