आमदार कडूंनी अतिरेकी भाषा वापरू नये : रामदास आठवले

sarkarnama.in
शुक्रवार, 9 जून 2017

जळगाव - शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. मात्र त्यासाठी केवळ आंदोलनच नव्हे तर चर्चाही आवश्‍यक आहे. मुख्यमंत्र्यांनी चर्चेची तयारी दर्शविली असून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बच्च पाटील यांनी चर्चा करावी. त्यानंतर 31 ऑक्‍टोबरपूर्वी दोन महिने अगोदरही कर्जमाफी होवू शकते, अशा प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केल्या आहेत. आमदार बच्च कडू यांनी अतिरेकी भाषा वापरू नये, असे आवाहनही आठवले यांनी यावेळी केले.

एका कार्यक्रमासाठी आठवले जळगावमध्ये आले होते. विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी बोलताना आठवले म्हणाले, "शेतकरी कर्जामुळे आत्महत्या करीत आहेत, ही चिंतेची बाब आहे. त्यांना कर्जमाफी निश्‍चित मिळाली पाहिजे. मात्र हा प्रश्‍न चर्चेने सोडविला पाहिजे. आपल्या मागण्यासाठी आंदोलन करणे हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे. मात्र त्यासोबत चर्चाही केली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचा प्रश्‍न सोडविण्यसाठी चर्चा करण्याची तयारी दर्शविली पाहिजे. त्यांच्यासोबत आंदोलनकांनी व विरोधी पक्षाने चर्चा केली पाहिजे. त्यामुळे हा प्रश्‍न सुटेल. कदाचित 31 ऑकटोबरच्या दोन महिने अगोदरच कर्ज माफी मिळेल.' आमदार बच्चू कडू यांच्या विधानाबाबत बोलताना ते म्हणाले, "ते चांगले नेते आहेत. त्यांनी बॉंम्ब फेकण्यासारखी अतिरेकी भाषा करू नये; त्यांनी संयमाने बोलावे.'