तरुणी बलात्कारप्रकरणी शालक, मेहुणा अटकेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

जळगाव - भुसावळच्या १६ वर्षीय तरुणीवर बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासांत संशयितांना अटक केली. अटकेतील दोघे शालक-मेहुणे असून, झुडपात बसलेल्या प्रेमीयुगुलास हेरून त्यांनी तरुणीवर बलात्कार करीत तरुणाला लुटले होते.

तरुणीच्या तक्रारीनंतर गुन्हे शाखेने संपूर्ण परिसर पिंजून काढत संशयितांच्या केवळ वर्णनावरून दोघांच्या मुसक्‍या आवळल्या. किरण वसंत कोळी व त्याचा मेहुणा वासुदेव नारायण तायडे अशी संशयितांची नावे आहेत. 

जळगाव - भुसावळच्या १६ वर्षीय तरुणीवर बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासांत संशयितांना अटक केली. अटकेतील दोघे शालक-मेहुणे असून, झुडपात बसलेल्या प्रेमीयुगुलास हेरून त्यांनी तरुणीवर बलात्कार करीत तरुणाला लुटले होते.

तरुणीच्या तक्रारीनंतर गुन्हे शाखेने संपूर्ण परिसर पिंजून काढत संशयितांच्या केवळ वर्णनावरून दोघांच्या मुसक्‍या आवळल्या. किरण वसंत कोळी व त्याचा मेहुणा वासुदेव नारायण तायडे अशी संशयितांची नावे आहेत. 

भुसावळ फिल्टर हाउस रोडवरील रहिवासी तथा नामवंत महाविद्यालयातील १६ वर्षीय विद्यार्थिनी प्रियकरासोबत रविवारी (ता. १) सायंकाळी फिरण्यासाठी गेली. दोघेही अकलूद शिवारात पिळोदा रोडलगत झुडपांच्या आडोशात बसले असताना तीस ते पस्तीस वयोगटातील दोघा भामट्यांनी तरुणाच्या कानाजवळ बंदूक (एअरगन) लावत त्याच्या खिशातील २ हजार ६० रुपये व सहा हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून पीडितेवर बलात्कार केला होता. 

गुन्हा घडल्यानंतर काही वेळातच जिल्हा पोलिस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांनी संपूर्ण यंत्रणा गुन्ह्यातील संशयितांच्या शोधार्थ लावली. अप्पर अधीक्षक नंदकुमार ठाकूर घटनास्थळावर तळ ठोकून होते; तर गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी घटनास्थळासह संपूर्ण तालुका पिंजून काढला.

निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांच्या पथकातील साहाय्य निरीक्षक आर. टी. धारबळे, नारायण सोनवणे, मनोहर देशमुख, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, रवींद्र गायकवाड, योगेश पाटील, रामकृष्ण पाटील, दिलीप येवले, सतीश गवळी, अशोक चौधरी, चंद्रकांत पाटील, विजय पाटील, दिनेश बडगुजर, जयंत चौधरी यांच्या वेगवेगळ्या पथकांनी शोध मोहीम राबविली. 

त्यात पथकाने किरण वसंत कोळी (वय २८, रा. अकलूद, ता. यावल) याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या सोबत मेहुणा वासुदेव नारायण तायडे हा गुन्ह्यात सहभागी असल्याचे सांगितले. पोलिसांनी तायडे याला रायपूर (ता. रावेर) येथील राहत्या घरून काल (ता. २) रात्रीच अटक केली. अटकेनंतर दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, संशयितांकडून हिसकावलेला मोबाईल, एअरगन आणि मोटारसायकल जप्त करण्यात आल्याचे निरीक्षक चंदेल यांनी सांगितले.

तर्रऽऽऽ नशेत जागली वासना
अटकेतील संशयित किरण कोळी हा गुरे चारतो, पत्नी त्याला सोडून निघून गेली आहे. त्याचा चुलत मेहुणा वासुदेव नारायण तायडे हा शेतीकाम करतो. घटनेच्या अगोदर किरण चुलत बहिणीच्या घरी आला व जाताना त्याने वासुदेवला दुचाकी मागितली. मात्र दुचाकी न देता वासुदेव स्वतःच किरणच्या सोबत निघाला. रस्त्यात यथेच्छ दारू ढोसल्यानंतर दोघेही दुचाकीने जात असताना झुडपांच्या आडोशातील प्रेमीयुगुल त्यांच्या नजरेस पडले. दोघेही संशयित युगुलाच्या जवळ गेले. त्यातील तरुण शुभम बारसे याला मारल्यावर भेदरलेल्या अवस्थेत कपडे सावरत असलेल्या मुलीस किरणने पकडले व वासुदेवने तरुणाला एअरगन लावली. तर्रऽऽऽ नशेत किरणची वासना जागे झाली आणि त्याने परिस्थितीचा फायदा घेत तरुणीवर अत्याचार केला.