धनगर समाजाचे नांदगावला रास्तारोको आंदोलन 

nandgao
nandgao

नांदगाव : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करुन त्याची तत्काळ अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी तालुक्यातील सकल धनगर समाजाच्यावतीने येथील हुतात्मा चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या रास्तारोकोमुळे औरंगाबाद, मालेगाव, चाळीसगाव, येवला आदी भागांकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावर तासाहून अधिक काळासाठी वाहतुकीची कोंडी झाली होती.

आरक्षणाच्या मागणीसाठी तालुक्याच्या विविध भागातून एकत्रित आलेल्या धनगर समाज बांधवांनी एकत्र येऊन येळकोट येळकोट जय मल्हार, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतंय देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही अशा जोरदार घोषणा दिल्यात देत समाजातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी नेते कार्यकर्ते यांचा सहभाग लक्षवेधी असा होता. 

साक्षी संजय देवकथे या युवतीने आंदोलकांसमोर परखड असे केले भाषण आंदोलनस्थळी चर्चेचा विषय बनला देशाच्या राज्य घटनेनुसार धनगर समाजाचा समावेश हा अनुसुचित जमातीमध्येच आहे. परंतु धनगड व धनगर असा वाद निर्माण करुन धनगर समाजाला जाणीवपूर्वक मागील सत्तर वर्षे आरक्षणापासून वंचित ठेवल्याची भावना साक्षीने व्यक्त केल्यावर तिच्या वक्तव्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. मनमाडचे माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, माजी उपनगराध्यक्ष शिवाजीराव पाटील, मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष सीताराम पिंगळे, सनी फसाटे, डॉक्टर गणेश चव्हाण, सुनील सोर, शरद आयनोर, बिरू शिंदे आदींची भाषणे झाली.

धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा, सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, आरक्षणासाठी आत्महत्या केलेले परमेश्वर घोंगडे यांचे कुटुंबास 25 लाखांची आर्थिक मदत करावी, धनगर समाजातील विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती तात्काळ अदा करावी, मेंढपाळांना गायरान जमिनी राखीव ठेवाव्यात,पावसाळ्यात वनजमीनीवर मेंढपाळांना चराई कुरणे राखीव ठेवावीत आदी मागण्याचे निवेदन तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांना सादर करण्यात आले. या आंदोलनाला आम आदमी पार्टी,भारिप बहुजन महासंघ,हिंदू खाटीक समाज,संतुजी बिग्रेड,राष्ट्रीय समाज पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस आदींनी पाठिंबा दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com