राज ठाकरे कल्पक नेते - रतन टाटा

संपत देवगिरे
सोमवार, 30 जानेवारी 2017

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रयत्नातुन टाटा ट्रस्टच्या सामाजिक दायित्व निधीतून उभारलेल्या वनौषधी उद्यान प्रकल्पाला ठाकरे यांच्या निमंत्रणावरुन त्यांनी आज नाशिकला भेट दिली.

नाशिक - राज ठाकरे कल्पक नेते आहेत. नाशिकसाठी त्यांनी केलेले काम आणि विशेषतः वनौषधी उद्यान हा प्रकल्प अतिशय चांगला आहे. त्याने नाशिकच्या सौंदर्यात भर पडेल. लोकांसाठी उपयुक्त आहे, असे देशातील ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी आज (सोमवार) येथे केले. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रयत्नातुन टाटा ट्रस्टच्या सामाजिक दायित्व निधीतून उभारलेल्या वनौषधी उद्यान प्रकल्पाला ठाकरे यांच्या निमंत्रणावरुन त्यांनी आज नाशिकला भेट दिली. महापालिका निवडणूकीच्या तोंडावर रतन टाटा यांची ही भेट नाशिककरांसाठीही चर्चेचा विषय ठरला.

टाटा ट्रस्टच्या कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबलीटी (सीएसआर) योजनेतून महराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरात विविध सुशोभिकरणाचे प्रकल्प साकारले. विशेषतः शहराच्या प्रवेशद्वारावरील वन विभागाच्या उद्यानाचे हस्तांतरण करुन तेथे उभारलेले उद्यान, लेझर शो आणि वन्यप्राण्यांच्या प्रतिकृती बसविण्यात आल्या असुन पुढील दहा वर्षे त्याची देखभाल टाटा समुहच करणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना कोणतीही तोशीस न पडता एक चांगला प्रकल्प उभा राहीला आहे. गेल्याच आठवड्यात विविध चित्रपट ताराकंनीही शहराला भेट देऊन या प्रकल्पांची पाहणी केली होती. त्यामुळे राज ठाकरेंचे नेतृत्व चर्चेत आले.
 

उत्तर महाराष्ट्र

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): जैताणे(ता.साक्री) येथील धनगर समाजाचे कार्यकर्ते तुकाराम नका ठाकरे हे गेल्या 30 वर्षांपासून...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

निजामपूर (धुळे): येथील जवाहरलाल वाचनालयातर्फे नुकतीच आठवी ते दहावी व अकरावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन गटात शिष्यवृत्ती...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

चार दिवसांवर उत्सव; मूर्तिकार, मंडळांचीही लगबग वाढली जळगाव - गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...अशी आर्त हाक देत...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017