गिरीश महाजन यांच्याकडून लाल दिव्याचा वापर झाला बंद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

नाशिक - केंद्रीय मंत्रिमंडळाने सरकारी वाहनांवर लाल दिवा वापरावर निर्बंध घालताच, पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी लाल दिव्याचा वापर थांबवला आहे. मंत्री झाले म्हणजे वेगळे असे काही नसते यादृष्टीने केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. श्री. महाजन यांनी दौऱ्यावेळी "गार्ड ऑफ ऑनर' नको, असा निर्णय यापूर्वी घेतला होता. यासंबंधाने त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा उपस्थित केली होती. "गार्ड ऑफ ऑनर'साठी सशस्त्र पोलिसांना ताटकळत बसणे उचित नाही.

नाशिक - केंद्रीय मंत्रिमंडळाने सरकारी वाहनांवर लाल दिवा वापरावर निर्बंध घालताच, पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी लाल दिव्याचा वापर थांबवला आहे. मंत्री झाले म्हणजे वेगळे असे काही नसते यादृष्टीने केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. श्री. महाजन यांनी दौऱ्यावेळी "गार्ड ऑफ ऑनर' नको, असा निर्णय यापूर्वी घेतला होता. यासंबंधाने त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा उपस्थित केली होती. "गार्ड ऑफ ऑनर'साठी सशस्त्र पोलिसांना ताटकळत बसणे उचित नाही. त्याऐवजी पोलिस दलातील विविध कामांत दलाचा उपयोग करून घेण्यात यावा, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली होती, अशी माहिती श्री. महाजन यांनी दिली. त्याचबरोबर बंदोबस्तासाठी पोलिसांचा भलामोठा ताफा न वापरण्याचा निर्णय आपण घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.