'सीसीटीव्ही'मुळे मिळाली सोन्याच्या बांगड्या असलेली बॅग परत

Return the bag of gold bangles received because of CCTV
Return the bag of gold bangles received because of CCTV

नाशिक : गंजमाळ ते महामार्ग बसस्थानक असा प्रवास करताना वयोवृद्ध महिला रिक्षामध्येच बॅग विसरल्या. त्या बॅगेत साडेसहा तोळ्याच्या 1 लाख 92 हजार रुपयांच्या बांगड्या होत्या. रिक्षाचालकाची माहिती नसल्याने मुंबई नाका पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि रिक्षाचालक सापडला. त्यानेही सदरची बॅग घरात जशीच्या तशी ठेवली होती. मात्र, रिक्षाचालकाला शोध घेण्यात सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना तपासात महत्त्वाचे ठरले. 

सुमतीलाल अमृतलाल शहा (रा. सर्वोदयनगर, गंजमाळ, नाशिक) या 84 वर्षीय महिला गेल्या 2 सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजता गंजमाळ येथून महामार्ग बसस्थानक असा रिक्षाने प्रवास केला होता. त्यावेळी त्या रिक्षामध्येच त्यांची एक बॅग विसरल्या होत्या. त्या बॅगेत साडेसहा तोळ्याच्या 1 लाख 92 हजार रुपयांच्या सहा बांगड्यांसह अन्य वस्तूही होत्या. मात्र रिक्षाचालकांची कोणतीही माहिती त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे त्यांनी मुंबई नाका पोलिस ठाणे गाठून वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज कारंजे यांच्याकडे माहिती दिली. त्यांनी घटनेची गांभीर्य ओळखून पोलिस उपनिरीक्षक एस.सी. सोनोने यांच्याकडे तपास दिला. त्यासाठी पोलिस हवालदार क्षीरसागर, एन. व्ही. लिलके, वाय.पी. गायकवाड, वाय.एस. लोंढे, एस.पी. गुंजाळ यांचे एक पथक नेमले. या पथकाने गंजमाळ ते महामार्ग बसस्थानक या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी ताब्यात घेतले. त्याआधारे त्यांनी रिक्षाची ओळख पटविली आणि त्या रिक्षाच्या क्रमांकावरून रिक्षाचालक अब्बास साबीर सय्यद याचा शोध घेतला. 

रिक्षाचालक सय्यद यास चौकशीला बोलाविल्यानंतर, त्यानेही रिक्षाचा विसरलेली बॅग जशीच्या तशीच आपल्या घरी ठेवली होती. त्याने ती बॅग पोलिस ठाण्यात आणून दिली. त्यातील दागिनेही जसेच्या तसेच होते. यावेळी वृद्ध महिला सुमतीलाल शहा यांच्याकडे सदरची बॅग आज परत सोपविण्यात आली. त्यांनाही त्यांची बॅग परत मिळाल्याने मोठा आनंद झाला आणि त्यांनी पोलिस निरीक्षक मनोज कारंजे यांच्यासह पोलिस पथकाचे तोंड भरून कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com