चाळीसगावात दरोडा : एका महिलेचा खून, पती गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला.

 

जळगाव : चाळीसगाव शहरातील हिरापूर रोडवरील एका घरावर आज (गुरुवार) पहाटे दरोडेखोरांनी टाकलेल्या दरोडा टाकून रहिवाशांवर केलेल्या हल्ल्यात एक महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती गंभीर जखमी झाले आहेत. 

पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला. त्यामध्ये दरोडेखोरांनी तेथे राहणाऱ्या दांपत्याला जबर मारहाण केली. त्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. 

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत दगडू दौलत देवरे हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. दरोडेखोरांच्या हल्यात जिजाबाई दगडू देवरे मरण पावल्या आहेत. दरोडेखोरांनी दोन तोळे सोने आणि रोकड घेऊन पोबारा केला. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत. 
 

Web Title: robbers kill a woman; her husband seriously injured