आरटीईची आज पहिली सोडत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

नाशिक - आरटीईअंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठीची पहिली सोडत उद्या (ता. 6) काढली जाणार आहे. निर्धारित मुदतीमध्ये सहा हजार 320 जागांसाठी 13 हजार 620 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यासाठीची पहिली सोडत शासकीय कन्या विद्यालयामध्ये दुपारी एकला काढली जाणार आहे. 

शिक्षण हक्क कायद्यान्वये आर्थिक दुर्बल घटकातील पाल्यांना अनुदानित व विनाअनुदानित इंग्रजी-मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये 25 टक्के राखीव प्रवेशासाठी 2 मार्चपर्यंत पाल्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार नाशिकसह जिल्ह्यातील सहा हजार 320 जागांसाठी 13 हजार 620 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यासाठीची पहिली सोडत उद्या दुपारी एकला शासकीय कन्या विद्यालयामध्ये काढली जाणार आहे. नाशिक शहरातील शाळांसाठी शंभर टक्के अर्ज आले आहेत, तर ग्रामीण भागातील 65 शाळांकडे एकही अर्ज आलेला नसल्याचे चित्र आहे. नव्याने सुरू झालेल्या शाळांकडे पालकांनी अर्ज केलेले नाही. सोडतीसंदर्भातील पालकांना शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून मोबाईलवर संदेश देण्यात आलेले आहेत. त्यानंतर सोडतीमध्ये नावे स्पष्ट झाल्यानंतर पालकांनी येत्या 15 मार्चपर्यंत संबंधित शाळेकडे कागदपत्रे सादर करीत प्रवेश निश्‍चित करावयाचा आहे. कागदपत्रांच्या अपूर्तेतेमुळे प्रवेश नाकारण्यात आल्यास संबंधित पाल्यास पुन्हा प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे पालकांनी प्रवेशासाठीचे कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी केले. 

Web Title: RTE first lottery today