दुसऱ्या फेरीवरच अडले घोडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

जळगाव - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांनाच प्रवेश देण्यात येत होता. मात्र, प्रवेश शिल्लक असल्याने यंदा वंचित घटकांमधील मुलांनाही प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. यासाठी २६ मे ते ४ जून दरम्यान अर्ज भरण्याची मुदत शिक्षण विभागातर्फे देण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यात दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रियाच पूर्ण न झाल्याने नव्याने ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. दुसरी फेरी पूर्ण झाल्यानंतरच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नवीन अर्ज भरता येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली.

‘आरटीई’ची दुसरी प्रवेश प्रक्रिया पार पडली. या फेरीत १ हजार १५१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित करण्यात आले होते. त्यापैकी अजूनही १२४ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकीच आहे. प्राथमिक शिक्षण विभागातर्फे दुसरी फेरी पूर्ण करण्यासाठी २५ मेपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, या मुदतीतही विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे तिसऱ्या फेरीसाठी नवीन अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया अद्यापही सुरू झाली नाही. दरम्यान, आज सायंकाळपर्यंत झालेल्या प्रवेशांची यादी व शिल्लक विद्यार्थ्यांची यादी पूर्ण करून सदर अहवाल उद्या (२९ मे) शासनास पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आज समजणार मुदत
शिक्षण विभागातर्फे दुसऱ्या फेरीचा अहवाल शासनाला पाठविल्यानंतर तिसऱ्या नवीन फेरीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात होईल. शिक्षण विभागाचा अहवाल दिल्यानंतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कोणत्या मुदतीत अर्ज करता येतील, याबाबतची माहिती शिक्षण विभागातर्फे उद्या (२९ मे) देण्यात येणार आहे.

Web Title: RTE school education student admission

टॅग्स