'सकाळ-कलांगण' बहरले कुसुमाग्रजांच्या अंगणात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी व सध्याच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यालयात झालेल्या 'सकाळ-कलांगण'च्या या कार्यक्रमास शहर परीसरातील कलावंतांनी हजेरी लावत कलांचे सादरीकरण केले.

नाशिक : रंग, रेषांची उधळन करत कॅनव्हासवर चिथारलेले निसर्गचित्र, सुमधुर गायन अन्‌ जोडीला चिमुरड्यांकडून कथ्थक नृत्याचे सादरीकरण. कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या कवितांचे गायन. सुलेखनातून मराठी भाषेचा केलेला जागर असा कलेचा आविष्कार अनुभवायला मिळाला.
त्र्यंबक रोडवरील कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी व सध्याच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यालयात झालेल्या 'सकाळ-कलांगण'च्या या कार्यक्रमास शहर परीसरातील कलावंतांनी हजेरी लावत कलांचे सादरीकरण करतांना कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांना अभिवादन केले.

कार्यक्रमास माजी मंत्री तथा महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे प्रमुख प्रशांतदाद हिरे, 'सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने. ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार, प्राचार्य मकरंद हिंगणे, दिनकर जानमाळी, मानसी कुलकर्णी यांच्यासह शहरातील कलावंत उपस्थित होते.

प्रारंभी कृपा परदेशी या दृष्टीबाधित मुलीनं आपल्या सुमधुर आवाजाने उपस्थितांवर मोहिनी फेरली. त्यानंतर श्रीकला डान्स ऍकॅडमीच्या विद्यार्थिनींनी मानसी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कथ्थक नृत्याचे सादरीकरण केले.
प्रसिद्ध सुलेखनकार नंदु गवांदे यांनी यावेळी मनमोहक मराठी हस्ताक्षराचे प्रात्येक्षिके दाखविली. तर प्राचार्य मकरंद हिंगणे, सुखदा बेहरे, मिलींद धटींगण यांनी कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या कवितेचे गायन केले. मराठी राज भाषा दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमामुळे कलावंतांना हक्‍काचे स्थान मिळाल्याची भावना सहभागी कलावंतांनी व्यक्‍त केली.

Web Title: sakal kalangan gets good response