‘सकाळ-कलांगण’ रविवारी बहरणार भक्तिधाममध्ये

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

नाशिक - ‘सकाळ-कलांगण’ रविवारी (ता. २८) सकाळी आठला पेठ रोडवरील भक्तिधाममध्ये बहरणार आहे.

शहरातील ललित कला महाविद्यालयाचे प्राचार्य, कलाशिक्षक व कलारसिकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘सकाळ-कलांगण’चा हा १५ वा उपक्रम आहे. 

पेठ रोडवरील भक्तिधाम शहरातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. प्रवेशद्वारावर अग्रभागी सप्तशृंगी व गणपती यांच्या मोठ्या मूर्ती आहेत. नारळांची उंच उंच झाडे, इमारतीचे विविध आकार असल्याने वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या ठिकाणी विविध आकारातील मूर्ती आहेत. या ठिकाणी विविध राज्यांतून येणारे भाविक भेट देतात. 

या आगोदर तपोवनातील गोदा-कपिला संगम, पंचवटीतील ऐतिहासिक काळाराम मंदिर, कुसुमाग्रज स्मारक, संत गाडगे महाराज धर्मशाळा, कालिका मंदिर, हुतात्मा स्मारक, ट्राफिक चिल्ड्रन पार्क, ब्रिटिशकालीन जिल्हाधिकारी कार्यालय, सरकार वाडा, होलीक्रॉस चर्च, य. म. पटांगण, कुसुमाग्रज निवासस्थान, बाळासाहेब ठाकरे ऐतिहासिक संग्रहालय, लंडन पॅलेस या ठिकाणी विविध कला साकार झाल्या आहेत. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणाऱ्या ‘सकाळ-कलांगण’मध्ये कलाकारांबरोबरच विधिज्ञ, डॉक्‍टर, वास्तुविशारद, उद्योजक, नामवंत चित्रकार, विद्यार्थी, कलारसिक, युवक-युवती, अधिकारी, शैक्षणिक, राजकीय, साहित्यिक आदी क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होऊन आपल्या भावना विविध कलांच्या माध्यमातून प्रगट करतात. संगीत, बासरी, भक्तिगीते, चित्र, शिल्प, नृत्य, गायन, मिमिक्री यांसारख्या उपक्रमांनी आतापर्यंत रंगत वाढविली आहे. नामांकित चित्रकारांबरोबर चित्र रेखाटण्याची व मार्गदर्शन घेण्याची संधी असते.