ढोल बाजे, ढम ढम बाजे ढोल...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

नाशिक - ढोल बाजे, ढम ढम बाजे ढोल... अशा व गरबाच्या विविध गीतांच्या ठेक्‍यावर "सकाळ-मधुरांगण' आणि डी 4 संस्थेतर्फे सुरू असलेल्या गरबा कार्यशाळेचा दुसरा दिवस गाजला. ज्यांना गरबा शास्त्रशुद्ध येत नाही, अशा महिलांसाठी पाच दिवसांत गरबा शिकण्याची संधी लाभली आहे. या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, अनेक महिला गरबाचे धडे गिरवत आहेत.

गरबा हा नृत्यप्रकार अगदी सोप्या अशा 20 स्टेपवर आधारित असतो. मात्र, अनेकदा त्यातील स्टेप न समजल्याने गरबाला जाण्यासाठी महिला नाखूश असतात. नवरात्रोत्सवातील तरुणाईचा सर्वांत आवडता प्रकार म्हणून गरबाकडे पाहिले जाते. अनेक तरुणींनाही नृत्य येत नसल्याने याच्या आनंदाला मुकावे लागते. अशा अनेक तरुणी आणि महिलांची अडचण लक्षात घेऊन "सकाळ'चे महिलांचे व्यासपीठ असलेल्या "मधुरांगण'तर्फे गरबा नृत्य शिकविण्याची कार्यशाळा सुरू आहे. यातील दोन दिवसांच्या प्रशिक्षणाला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. पहिल्या दिवशी प्राथमिक ज्ञान दिल्यानंतर ठगियो, पोपट, दोडियोला नृत्यात कसे संमिश्र करायचे, याचे ज्ञान महिलांना देण्यात आले.

मला गरबा शिकण्याची खूप इच्छा होती. त्याचे शिक्षण इतक्‍या कमी वेळेत "सकाळ'ने उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार. मला पहिल्याच दिवशी यातील स्टेप इतक्‍या सोप्या करून सांगितल्या, की गरबा छान जमणार, असा आत्मविश्‍वास आला आहे.
- गौरी खैरनार

गरबाचे प्रशिक्षणवर्ग अनेकदा कॉलेज रोड, गंगापूर रोड येथेच असतात. आम्हाला इच्छा असूनही इतक्‍या लांब जाता येत नव्हते. पंचवटी विभागातही त्याचे प्रशिक्षणवर्ग दिल्याने माझ्यासारख्या अनेकांना गरबा शिकता येत आहे.
- प्रवीणा गोडसे

टॅग्स