सटाण्यात श्री शंकर महाराजांचा समाधी सोहळा उत्साहात साजरा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

सटाणा : बागलाण तालुक्याचे आराध्यदैवत श्री शंकर महाराज यांचा समाधी सोहळा सालाबादाप्रमाणे येथील भाक्षी रस्त्यावरील श्री शंकर महाराज व पारनेरकर महाराज मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सटाणा : बागलाण तालुक्याचे आराध्यदैवत श्री शंकर महाराज यांचा समाधी सोहळा सालाबादाप्रमाणे येथील भाक्षी रस्त्यावरील श्री शंकर महाराज व पारनेरकर महाराज मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सकाळी आठ वाजता श्री शंकर महाराज व पारनेरकर महाराज मंदिरात शंकर महाराजांचे भक्त धनंजय वानखेडे, मंगेश शुक्ल, धीरज पंडित, नितीन सोनवणे, एड. चंद्रकांत अहिरे, रामसिंग पवार, सागर मेणे यांच्या सपत्नीक हस्ते रुद्र अभिषेक करण्यात आला. पुरोहित सुदर्शन मुळे यांनी पौरोहित्य केले. या श्री शंकर महाराज समाधी सोहळ्याचे औचित्य साधून उदय माथेसुळ यांनी मंदिरात ३ फुट बाय ४ फुट या आकारातील श्री शंकर महाराजांची भव्य रांगोळी रेखाटली होती. आजच्या सोहळ्याचे हे प्रमुख आकर्षण ठरले. आज दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. अनेक भाविक महाराजांची रांगोळी आपल्या मोबाईलमध्ये फोटोच्या सहाय्याने कैद करून घेत होते. नगराध्यक्ष सुनील मोरे, नगरसेवक दिनकर सोनवणे व हेमंत भदाणे यांच्या हस्ते भाविकांना शंकर बांवनीचे वाटप करण्यात आले. यानंतर भाविकांनी शंकर बांवनीचे सामुहिक वाचन केले.

सोहळ्यास ऍड. नितीन चंद्रात्रे, राहुल चंद्रात्रे, ऍड. नरेंद्र टाटीया, शंकर महाराज भक्तव सेवेकरी ऍड. सतीश चिंधडे, बापू ब्राह्मणकर, भाऊसाहेब खैरनार, शांतीलाल भांगडिया, सुदाम थोरात, संगीता शुक्ल, रुपाली पंडित, नाना मोरकर, प्रदीप बधान, वैशाली वानखेडे, संगीता मोरे, सोनाली सोनवणे, माधवी सोनवणे आदींसह भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.
 

Web Title: samadhi day of shankar maharaj in satana