भिडे म्हणतात, माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने होतात मुले!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते. आजपर्यंत 180 जोडप्यांनी हा आंबा खाल्ला असून, त्यापैकी दीडशे जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली आहे. 

नाशिक : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी नाशिकमध्ये एका कार्यक्रमादरम्यान अजब दावा केला असून, त्यांनी चक्क माझ्या शेतातील आंबा खालेल्या जोडप्यांना मुले होतात असे म्हटले आहे.

भिडे म्हणाले, की माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते. आजपर्यंत 180 जोडप्यांनी हा आंबा खाल्ला असून, त्यापैकी दीडशे जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली आहे. 

खासदार सुप्रिया सुळे यांनीही संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. भिडेंचे वक्तव्य म्हणजे तमाम महिला वर्गाचा अपमान आहे, भाजप आणि संबंधित लोकांना मुळात विज्ञानावर विश्वासच नाही. त्यामुळे ते असली वक्तव्य करतात, सावित्रीबाईंच्या महाराष्ट्रामध्ये आशा प्रकारची वक्तव्य म्हणजे दुर्दैव आहे.

भिडे गुरुजींनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखे आहे, त्यामुळे जादूटोणा कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी प्रतिक्रिया अंनिसचे राज्य सचिव मिलिंद देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Sambhaji Bhide talked about mango and child birth