सक्तीच्या भूसंपादनामुळे पाच ऐवजी चौपट मोबदला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

नाशिक - नानाविध प्रयत्न करूनही नागपूर समृद्धी महामार्गासाठी प्रतिसाद मिळत नसलेल्या सुमारे 358 हेक्‍टर जमिनीचे सक्तीने भूसंपादन केले जाणार आहे. तशी अधिसूचना शासनाने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे लॅंड पुलिंग, जमीन खरेदी नंतर हा विषय आता सक्तीच्या भूसंपादनापर्यंत आला आहे. सक्तीने संपादन प्रक्रियेपूर्वी काही  प्रतिसादाची प्रशासनाला अपेक्षा आहे. 

राज्यातील 10 जिल्हे, 24 तालुके आणि 391 गावांना जोडणाऱ्या नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व सिन्नर या दोन तालुक्‍यांतील 46  गावातील 1265 हेक्‍टर जमीन लागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) हा महामार्ग विकसित करणार असून, या मार्गामुळे नागपूर ते मुंबई प्रवास 16 तासांवरून 8 तासांवर येऊ शकणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हे राज्याचे मोठे भाग थेट आंतरराष्ट्रीय आयात निर्यातीचे केंद्र असणाऱ्या मुंबई येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टशी (जेएनपीटी) जोडले जाणार आहेत. 

सक्तीने भूसंपादन 
प्रकल्पांसाठी सुरवातीला जमीन मालकांना भागीदारीत सहभाग देण्यासाठीचा "लॅंड पुलिंग' जमीन खरेदीचा प्रस्ताव ठेवला गेला. पण त्यापोटीचा मोबदला परवडणारा नसल्याने त्याला अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे थेट खरेदीअंतर्गत जमिनी खरेदी झाल्या. एकंदर 1265 हेक्‍टर जमीन 1108 हेक्‍टर जमीन खासगी आहे. त्यातील सुमारे 
750 हेक्‍टर जमीन खरेदी झाली असून 358 हेक्‍टरच्या आसपास जमिनीची खरेदी बाकी आहे. संबंधित शेतकऱ्यांचा प्रतिसाद नसल्याने आता शासनाने अधिसूचना काढून 
सक्तीने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. 

Web Title: samruddhi highway land issue