धुळेकरांना भीम यात्रेचेही दर्शन! 

Samvidhan Morcha
Samvidhan Morcha

कापडणे : ऍट्रॉसिटी संरक्षण संघर्ष महामोर्चासाठी चोहोबाजूने मोर्चेकऱ्यांचे जथ्ये शहराकडे येत होते. अनेक सहकुटुंब होते.

शिरपूर आणि नरडाणा येथून एकाच वेळी आबालवृद्ध दाखल झालेत. त्यावेळी भीम यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. पाच किलोमीटरवरून पायी येऊनही त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा थकवा जाणवत नव्हता. त्यांची पावले मोर्चाच्या मुख्य स्थळाकडे वेग घेत होती. मोर्चात सहभागी होण्याचा हुरूप व आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओघळत होता. धुळे तालुक्‍यातील बऱ्याच गावांमधून भीम सैनिक पायी आले होते. त्यांची भीम पदयात्रा अविरत होती. 

संघर्ष महामोर्चासाठी मिळेल, त्या वाहनाने धुळे शहरात दाखल होण्यासाठी दलितबांधवांमध्ये जणुकाही स्पर्धा दिसत होती. सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. धुळे तालुक्‍यातील वलवाडी, भोकर, बिलाडी, नगाव, मोराणे, लळिंग, बाळापूर, फागणे, वरखेडी, कुंडाणे, चितोड या गावांतून बरेच मोर्चेकरी पायी धुळे शहरात दाखल झालेत. धुळे शहर बंद असल्याने व सुट्टे पैशांची कमतरता असल्याने काहींनी घरूनच तिखट, ठेच्याची शिदोरी बांधून आणली होती. भूक लागल्यावर शहरातीलच झाडाच्या सावलीचा आश्रय घेत शिदोरीचा आस्वादही काहींना घेतला. 

शिरपूर मधून आली भीमयात्रा 
शिरपूर तालुक्‍यातील मोर्चेकरी एकाच वेळी धुळे शहरातील देवपूरमध्ये दाखल झालेत. तेथून ते पाच किलोमीटर पदयात्रा करीत मोर्चास्थळी दाखल झाले. सुमारे दहा हजारांवरची ही भीमयात्रा शिरपूरमधून आली होती. त्याचवेळी नरडाणा येथील आबालवृद्ध दाखल झाले. त्यांच्या जत्थ्याचेही भीमयात्रेत आणि नंतर संघर्ष मोर्चात रूपांतर झाले. त्यांच्यातील उत्साह वाखणण्यासारखा होता. 

मोटारसायकलीवरून प्रवास 
शहराजवळील गावांतील तरुण सायकल, तसेच मोटार सायकलव्दारे दाखल झाले. त्यांनी गावागावांमध्ये प्रचार आणि प्रसारही मोठ्या प्रमाणात केला. वातावरण निमिर्तीसाठी तरुणांसह प्रौढांनी सहभाग नोंदविला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com