वाळू तस्करांनी केला महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

वाळू तस्करांचा दुसऱ्या दिवशीही हैदोस; निलंबित पोलिसासह तिघांना अटक 

सोलापूर : वाळू तस्करांनी दुसऱ्या दिवशीही महसूल विभागाच्या पथकावर हल्ला केला. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास विजापूर रस्त्यावरील नवीन चौत्रा नाका परिसरात  घडली असून या प्रकरणात वाळूतस्कर निलंबित पोलिस मैनोद्दीन कोरबूसह तिघांना अटक करण्यात आली आहे. 

वाळू तस्करांचा दुसऱ्या दिवशीही हैदोस; निलंबित पोलिसासह तिघांना अटक 

सोलापूर : वाळू तस्करांनी दुसऱ्या दिवशीही महसूल विभागाच्या पथकावर हल्ला केला. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास विजापूर रस्त्यावरील नवीन चौत्रा नाका परिसरात  घडली असून या प्रकरणात वाळूतस्कर निलंबित पोलिस मैनोद्दीन कोरबूसह तिघांना अटक करण्यात आली आहे. 

मैनोद्दीन कोरबू, पिंटू राठोड, अक्षय राठोड, अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. मंडलाधिकारी मनोज गायकवाड यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे. मैनोद्दीन कोरबू आणि त्याच्या साथीदारांनी गुरुवारी सकाळच्या सुमारासही होटगी रस्त्यावर कुमठे कॉर्नर परिसरात तहसीलदार हणमंत कोळेकर यांच्यावर हल्ला केला होता. त्या घटनेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास विजापूर रस्त्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. मंडलाधिकारी गायकवाड आणि त्यांचे सहकारी तलाठी वाय. एम. चिंचोळे, एस. के. फुलारी हे कारमधून (एमएच 45 ए 0806) वाळूवाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी निघाले होते. पहाटे पावणेसहाच्या सुमारास विजापूर रस्त्यावर चौत्रा नाका परिसरात वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकला महसूल विभागाच्या पथकाने थांबविण्याचा प्रयत्न केला. ट्रकचा पाठलाग करीत असताना मागून आलेल्या कारने (एमएच 13 ए 0175) अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. कारमधील लोकांनी खाली उतरून महसूल विभागाच्या पथकावर हल्ला केला. मैनोद्दीन कोरबू व त्याच्या साथीदारांनी पथकातील अधिकाऱ्यांना मारहाण केली. जवळच असलेल्या वस्तीवरील लोक आवाज ऐकून मदतीला धावून आले. हल्लेखोरांनी वाळूच्या ट्रकसह पळ काढला. 

घटनेनंतर पोलिसांनी आरोपींच्या शोधात पथके रवाना केली होती. विजापूर नाका पोलिसांनी कोरबू यास अक्कलकोट परिसरातून अटक केली, तर गुन्हे शाखेने पिंटू व अक्षय या दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 
 

 
 

उत्तर महाराष्ट्र

धुळे : देऊर परिसरातील भारतीय जीवन विमा निगम ग्राहकांनी सर्व प्रकारच्या  नवीन पाॅलीसी ची माहितीसह, जुन्या पाॅलिसींची...

10.57 AM

वणी : वरखेडा (ता. दिंडोरी) येथे तीन महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली अाहे. दरम्यान...

09.39 AM

पिलखोड(ता. चाळीसगाव), ता. 19 : सायगाव(ता. चाळीसगाव) शिवारात बिबट्याची दहशत कायम असून काल(ता. 18) संध्याकाळी पुन्हा पावणे पाचच्या...

09.00 AM