संजय गांधी, श्रावणबाळ योजनांबाबत संभ्रमावस्था

तुषार देवरे
शनिवार, 20 मे 2017

ऑनलाइन अर्जाच्या सूचना; मात्र ‘सॉफ्टवेअर’च उपलब्ध नसल्याने अडचणी

देऊर - राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याबाबत लाभार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. शासन स्तरावरून एक एप्रिलपासून दोन्ही योजनांसाठी लाभार्थ्यांकडून लेखी अर्ज न स्वीकारता ऑनलाइन अर्ज करावेत, अशा सूचना देण्यात आल्या. मात्र, यासाठी शासन स्तरावरून अद्याप कुठलीही यंत्रणा, सॉफ्टवेअर प्राप्त न झाल्याने आम्ही अर्ज कसे करावेत, असा प्रश्‍न लाभार्थ्यांनी उपस्थित केला आहे. 

निराधार ज्येष्ठ, अंध अपंग, शारीरिक व मानसिक आजारांनी पीडित व्यक्ती व निराधार विधवांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने आर्थिक दुर्बलांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना १९८० पासून राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थ्याला पाचशे रुपये अनुदान मिळते. धुळे तहसील कार्यालयात दर महिन्याला सामाजिक अर्थसहाय्य योजनांच्या प्रकरणात वाढ होत आहे. ग्रामीण व शहरी अशा दोन भागांत हे कामकाज सुरू आहे. आतापर्यंत निकषांनुसार अर्ज भरून दिले जात होते. मात्र, एक एप्रिलपासून शासनाने हस्तलिखित अर्जांऐवजी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया असावी, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र, त्यासाठीची यंत्रणा, सॉफ्टवेअर उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांची अडचण होत आहे. याबाबत पुढील मार्गदर्शन पत्र अथवा सूचना प्राप्त होईपर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार असल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. 

९५४ प्रकरणे प्रलंबित

धुळे तहसील कार्यालयात गेल्या १० मार्चला त्रैमासिक बैठक तहसीलदार अमोल मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तीत सामाजिक अर्थसहाय्याच्या पाच प्रकारांतील ९२२ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. अपूर्ण कागदपत्रे असलेली ७६० प्रकरणे नामंजूर कण्यात आली. मार्चअखेर ९५४ प्रकरणे प्रलंबित आहेत. ती जूनमध्ये होणाऱ्या बैठकीत मंजूर करण्यात येतील. त्यासाठी अपूर्ण कागदपत्रे असलेल्या लाभार्थ्यांनी तत्काळ तहसील कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या समाविष्ट प्रकरणांची पूर्तता करावी, असे आवाहन तहसीलदार अमोल मोरे यांनी केले आहे.

सर्व योजनांचे धुळे तालुक्‍यातील जे लाभार्थी लाभ घेत आहेत, त्यांनी त्यांचे ‘आधार कार्ड’ तत्काळ संजय गांधी निराधार योजनेच्या शाखेकडे जमा करावे.
- अमोल मोरे, तहसीलदार, धुळे (ग्रामीण)

योजनानिहाय मंजूर प्रकरणे
(मार्चअखेरपर्यंत धुळे तालुका)

संजय गांधी निराधार अनुदान योजना- १८५ प्रकरणे
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना- ३८८ प्रकरणे
इंदिरा गांधी निराधार योजना- २६९ प्रकरणे
राष्ट्रीय इंदिरा गांधी विधवा योजना- २२ प्रकरणे
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना- ५८ प्रकरणे

कागदपत्रांअभावी नामंजूर प्रकरणे 
श्रावण बाळ योजना - ४३७ 
इंदिरा गांधी योजना - २०६ 
संजय गांधी निराधार योजना - ११७ 

मार्चअखेर प्रलंबित प्रकरणे
श्रावण बाळ योजना - ६०४
संजय गांधी निराधार योजना - ११०
इंदिरा गांधी निराधार योजना - २४०

Web Title: sanjay gandhi shravanbal scheme confussion