सारंगखेडा यात्रेत आजपासून 'चेतक महोत्सवा'ची दौड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

सारंगखेडा - सारंगखेडा येथील कोटींच्या अश्‍वबाजारामुळे आतापर्यंत राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या एकमुखी दत्त यात्रेला मंगळवारपासून (ता. 13) प्रारंभ होत आहे. यंदा हायटेक "चेतक महोत्सवा'मुळे ही यात्रा जागतिक स्तरावर पोचली आहे. या वर्षी परदेशातील पर्यटक अश्‍वबाजाराला भेट देणार असून, दीड हजारावर घोडे दाखल झाले आहेत. यात्रेत उद्यापासून 27 डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रम होतील.

एकमुखी दत्त यात्रेला राज्यभरातून लाखो भाविक हजेरी असते. यंदा चेतक महोत्सवाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम होणार आहेत. महोत्सवाला या वर्षी पर्यटन विभागाची साथ मिळाली आहे. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी यासाठी विशेष नियोजन केले. पर्यटन विभागाकडून देशविदेशात प्रचार करण्यात आला आहे. पर्यटकांसाठी येथे तंबूनगरी उभारण्यात आली आहे. येथे सांस्कृतिक माहिती दिली जाणार आहे. उद्या सकाळी चेतक महोत्सवाचे उद्‌घाटन होईल. तसेच पारंपरिक पद्धतीने पालखी काढण्यात येईल. या वर्षी आतापर्यंत यात्रेत 70 घोड्यांची विक्री झाली आहे.

देशात जे मोजके अश्‍वबाजार भरतात, त्यात सारंगखेड्याच्या बाजाराचा समावेश आहे. यंदा या बाजारात दीड हजारावर घोडे दाखल झाले आहेत. त्यांची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेत विविध साहित्याची दुकाने थाटण्यात आली आहेत. प्रसाद सेवाभावी संस्थेतर्फे यात्रा आणि अन्य कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे.

उत्तर महाराष्ट्र

भुसावळ : येथील बांधकाम व्यवसायिक म्हणून परिचित असलेल्या सानिया कादरी यांच्या घरावर एैनपूर येथील संतप्त शेतकऱ्यांनी आज (...

06.54 PM

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील आरोग्य केंद्रात रुग्णांसह ग्रामस्थांना अजूनही पुरेशा...

04.06 PM

नाशिक - ठेकेदारांमध्ये काम खेचण्यासाठी लागलेली स्पर्धा व त्यातून निर्माण होणारा संघर्ष, काम मिळाल्यानंतर महापालिकेच्या प्रत्येक...

12.42 PM