साताराः गणेश विसर्जन मिरवणुकांवर ४२ सीसीटव्हीद्वारे पोलिसांचा वॉच

सचिन शिंदे
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

कऱ्हाड (सातारा): शहरासह मलकापूरात निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकांवर ४२ सीसीटव्हीद्वारे पोलिसांचा वॉच असणार आहे. शहरातील पोलिस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या नेतृत्वाखाली विसर्जन मिरवणुकीचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी चारशे पोलिस मागवण्यात आले आहेत. तीन कॅमेऱेही तैनात केले आहेत.

कऱ्हाड (सातारा): शहरासह मलकापूरात निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकांवर ४२ सीसीटव्हीद्वारे पोलिसांचा वॉच असणार आहे. शहरातील पोलिस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या नेतृत्वाखाली विसर्जन मिरवणुकीचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी चारशे पोलिस मागवण्यात आले आहेत. तीन कॅमेऱेही तैनात केले आहेत.

शहरात उद्या (मंगळवारी) सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मुर्तीचे विसर्जन आहे. सुमारे 284 मुर्ती उद्या कृष्णार्पण होणार आहेत. त्यासाठी  पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. शहरात ३६  ठिकाणी तर मलकापूरात सहा ठिकाणी सीसिटिव्ही कॅमेऱ्यांचा वाॅच असणार आहे. अनुचीत घटना टाळण्यासाठी पोलिसांनी यंदा मोठी सतर्कता घेतली आहे. यंदा दोन शिघ्रकृती दलाच्यै तुकड्या, शंभर गृह रक्षक दलाचे जवान बंदोबस्तासाठी आहेत.

शहरात वीस फिरती पथके ठेवली आहेत. महिला छेडछाड विरोधी दोन पथके आहेत. सुमारे पंचवीस ठिकाणी फिक्स बंदोबस्त आहे. दोन पोलिस उपाधीक्षक, दोन पोलिस निरिक्षक, पंधरा अधिकारी व सुमारे चारशे कर्मचारी बंदोबस्तासाठी आहेत. त्यात सात वेगवेगळे सेक्टर करून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यातील पट्रोलींगची जबाबदारी त्या त्या पोलिसांवर देण्यात आली आहे.

महत्वाचे
- विसर्जन मिरवणुकांवर ४२ सीसिटिव्हीचा वॉच
- अतिरिक्त पोलिस अधीक्षकांकडे  बंदोबस्ताचे नेतृत्व
-  दोन पोलिस उपाधीक्षकांची नेमणुक
- पंधरा अधिकाऱ्यांसह चारशे कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त
-  राज्य राखीव दलाचे दोन तुकड्या तैनात
-  शंभर गृहरक्षक दलाचे जवानही बंदोबस्तात
-  फिरत्या वीस पथकांची नेमणुक
- आठ सेक्टरद्वारे कर्मचाऱ्यांचा मिरवणुकीद्वारे वॉच
- चार कॅमेरे, तीन ध्वनी तपासणी यंत्रद्वारे राहणार लक्ष

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सरकारी थकबाकीदार सत्यपाल सिंह मंत्रिमंडळात 
दुर्दैवी अनिता अन्‌ तमीळ अस्मिता...!
धुळे जिल्ह्यात 351 वर्गखोल्या धोकादायक
एकाच कुटूंबातील 3 भावंडांचा तलावात बुडून मृत्यू
मानाच्या बाप्पांचे यंदाही हौदांमध्ये विसर्जन
भाविकांच्या गर्दीने रस्ते दिसेनासे झाले
'व्हेंटिलेटर' आणि 'हाफ तिकीट' सर्वोत्कृष्ट चित्रपट