सातपूरला बारा धार्मिक स्थळे हटविली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

सातपूर - सातपूर परिसरातील मुख्य रस्त्यावरील प्रमुख चार मंदिरांसह एकूण १२ मंदिरांवर आज प्रचंड पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. त्यात खंडेराव मंदिर, ओंकारेश्‍वर मंदिर, तसेच श्रमिकनगरच्या शनिमंदिराचा समावेश आहे.

सातपूर - सातपूर परिसरातील मुख्य रस्त्यावरील प्रमुख चार मंदिरांसह एकूण १२ मंदिरांवर आज प्रचंड पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. त्यात खंडेराव मंदिर, ओंकारेश्‍वर मंदिर, तसेच श्रमिकनगरच्या शनिमंदिराचा समावेश आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशाने कालपासून कारवाईस सुरवात झाली. काल सिडको परिसरातील मंदिरांचे मोठ्या फौजफाट्यासह अतिक्रमण हटविण्यात आले. आज सकाळी साडेनऊपासून सातपूर पोलिस ठाण्यासमोरील संकटमोचन हनुमान, साई मंदिरावर कारवाई केली. त्यानंतर सातपूर गावातील महादेववाडी येथील सप्तशृंगी मंदिर, त्याच रस्त्यावर असलेले विठ्ठल मंदिर जमीनदोस्त करण्यात आले. सातपूर कॉलनीतील छत्रपती विद्यालयाच्या भिंतीलगत खंडेराव महाराज मंदिर आहे. त्यावरही दोन जेसीबीने हातोडा मारून कारवाई केली. या कारवाईनंतर पथकाने सातपूर कॉलनी, श्रमिकनगर भागात मोर्चा वळवत अतिक्रमित मंदिरांचे बांधकाम पाडले. अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, अतिक्रमण उपायुक्त आर. एम. बहिरम आदींसह हजारो कर्मचाऱ्यांचा फौजफाटा होता.

१६ नोव्हेंबरला पुढील मंदिरांवर कारवाई
पुढच्या टप्प्यात सातपूर विभागातील अंबड लिंक रोडवरील पशुपतिनाथ मंदिर, मायको भिंतीलगत असलेले सिद्ध महादेव मंदिर, नीलधारा सोसायटीतील दक्षिणमुखी इच्छापूर्ती, साईनाथ मंदिर, जिजामाता शाळेजवळील हनुमान मंदिर, समतानगर येथील पूर्वाभिमुख हनुमान मंदिर, त्र्यंबक रस्त्यावरील अंबड टी-पॉइंटवरील दक्षिणमुखी हनुमान मंदिरावर कारवाई होईल.