‘मनपा’ लेखा विभागात तेरा कोटींचा अपहार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 ऑक्टोबर 2016

जळगाव - महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील रक्कम कपात करण्यात येते. मात्र, ही जवळपास १३ कोटींची कपात केलेली रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या निर्धारित खात्यात जमा केलेली नाही. त्यातून मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप शहीद भगतसिंग महापालिका कर्मचारी संघटनेने आज केला. याबाबत उपायुक्त राजेंद्र फातले यांना निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून रक्कम कपात करून ती कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या भविष्य योजनांमध्ये जमा केली जाते. परंतु, ‘मनपा’चे लेखा अधिकारी चंद्रकांत वांद्रे यांनी संबंधितांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम संबंधित खात्यात जमा केलेली नाही. ही रक्कम १३ कोटी ४३ लाख १२ हजार ३४ रुपये आहे. त्यामुळे या रकमेचा गैरव्यवहार झाल्याचा संशय असून ही माहिती माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी सात दिवसांत ही रक्कम निर्धारित खात्यात जमा करावी, तसेच लेखाधिकारी वांद्रेंवर महापालिका प्रशासनाने कारवाई केली नाही, तर त्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करू, असा इशारा देण्यात आला आहे.

कर्मचारी भविष्य निधी संस्था     रक्कम
एल.आय.सी.    ४६ लाख ६६ हजार ६८३
ग. स. सोसायटी    १ कोटी ३९ लाख ७९ हजार ८५३
भविष्य निर्वाह निधी    ७ कोटी ३१ लाख १८ हजार ०५४
परिभाषित अंशदान    २ कोटी, १ लाख, ५३ हजार ७२२
पारिभाषिक अनुदान    २ कोटी, १ लाख, ५३ हजार ७२२

उत्तर महाराष्ट्र

दिवाळीनंतरच्या लग्नसराईत दिसणार परिणाम नाशिक - देशभरातील करप्रणालीत एकसंघपणा यावा म्हणून केंद्र शासनाने १ जुलैपासून देशात...

12.00 PM

इगतपुरी - गेल्या चार दिवसांपासून शहरासह तालुक्‍यात सुरू असलेल्या संततधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. समाधानकारक पावसामुळे...

12.00 PM

नाशिक - राज्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत नाशिकमध्ये मालमत्ता व पाणीपट्टीचे दर कमी आहेत. त्यात वाढ न करता नगरसेवकांच्या विकास...

11.12 AM