निफाडमध्ये विद्यार्थ्यांची शालेय मंत्रीमंडळ निवडणूक

niphad
niphad

निफाड - प्राथमिक शाळा टाकळी विंचूर ता निफाड येथे विद्यार्थ्यांची शालेय मंत्रीमंडळ निवडणूक घेण्यात आली. १८ वर्षे पूर्ण झालेल्या लोकांद्वारे म्हणजे प्रौढ मतदान प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाते. हे प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रिया अनुभवली शाळेच्या २३० विध्यार्थ्यानी शालेय मंत्रीमंडळ निवडणुकीत भाग घेतला. आठ उमेदवार यातून निवडून देण्यात आले.

नामनिर्देशन झाल्यावर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. उमेदवारांना चिन्हांचे वाटप करताना तार्किकतेचा आधार घेतला. आरोग्यमंञी पदाच्या उमेदवारांना साबण, हण्डवाश, टूथब्रश सारखी चिन्हे दिलीत. सहलमंत्र्यांसाठी बस ते अंतराळयान ही चिन्हे दिलेत. प्रचारासाठी दोन दिवस दिले. प्रचारकाळात लहान व मोठ्या सुट्टीत आपल्यालाच मत मिळावे यासाठी आग्रही धरणारे उमेदवार वर्गात प्रचाराची संधी दिल्यावर मस्ती करणारे हात सौजन्याने जोडले जात होते. नम्रता व सहकार्य ही मूल्ये भिनत होती.

मंत्रीपदांसाठी चार पानांची मतपञिका बनवली.विद्यार्थ्यांना मतपञिकेवर त्यांच्या पसंतीच्या उमेदवारापुढे पेनने खूण कशी करायची याचे वर्गनिहाय प्रशिक्षण दिले. एका मंञीपदासाठी अधिक उमेदवारांना मते दिल्यास मत बाद होईल हेही निक्षून सांगितले. मतदानाच्या दिवशी अगदी निवडणूक कक्षा सारखे वातावरण, शिक्षकांनी मतदान अधिकारी १ते३ ची जबाबदारी सांभाळली. मतदार यादी म्हणून वर्गनिहाय याद्या केल्या. त्यावर मतदान केल्याची विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेतली.बोटास लावलेल्या शाईकडे उत्सुकतेने बघणार्या बालनजरा अनुभवल्या.

३री ते ७ वीच्या सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.दोन तास मतमोजणी सुरू होती. पं स सदस्य शिवाभाऊ सुराशे, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष बाळासाहेब मोकाटे, विषयतज्ञ जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत निकाल जाहीर केला.

शालेय मंत्रिमंडळात क्षितिजा मोकाटे मुख्यमंत्री, साहिल बोराडे अभ्यासमंत्री,दीपा जाधव आरोग्यमंत्री, शुभम कदम स्वच्छता मंत्री, संदेश पवार सहलमंत्री, ओम शिंदे क्रीडामंत्री, श्रावणी शिंदे परिपाठ मंत्री, श्रुती राजगिरे सांस्कृतिक मंत्री कविता राजगिरे पर्यावरण मंत्री नव्या मंञ्यांचा पाहुण्यांकडून निवडीचे प्रमाणपञ व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.गजानन उदार यांनी सर्व मंञ्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

गजानन उदार यांनी शालेय विध्यार्थ्यात लोकशाहीचे बाळकडू अशा अभिनव पद्धतीने रुजवण्याच्या गुरुजनांच्या प्रयत्नांना शिवाभाऊंनी कौतुकोद्गार काढून शाबासकी दिली. शिक्षक संजय देवरे, पृथ्वीराज भदाणे, प्रगीता अहिरे, बायजा भदाणे, सुरेखा बेंडके, परशुराम ठाकरे सुनिता. केकाण यांनी निवडणूक प्रक्रिया यशस्वी पाने पार पाडली. मुख्याध्यापक वाळीबा कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com